सभागृहाचं कामकाज तहकूब करणं ही सत्ताधाऱ्यांची खेळी; रोहित पवारांची टीका
मुंबई : विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना गट आणि भाजपवर (BJP) निशाणा साधताना केलं आहे. पण राऊतांच्या याच वक्तव्यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी गदारोळ सुरु आहे. राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे. दरम्यान, राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात गोंधळ झाल्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला.
रोहित पवार म्हणाले, संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं, ते निषेधार्थ आहे. त्याचं कुणीही समर्थन करण्याचं काहीही कारण नाही. राऊतांच्या विधानाबाबत कारवाई करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना होता. भाजपच्या सदस्यांकडून हक्कभंगही आणला होता. त्यावर तातडीने निर्णय द्यायला हवा होता. याला सभागृहात कुणाचाही विरोध नव्हता. तरीही त्यांनी पूर्ण दिवसाचं सभागृहातील कामकाज तहकूब केलं. हे चुकीच आहे.
ते म्हणाले, मागच्या हिवाळी अधिवेशनात आम्हाला प्रश्न मांडू देत नाहीत म्हणून जयंत पाटलांनी निर्लज्ज हा शब्द वापरला. तेव्हा त्यांचं सात दिवसांसाठी निलंबन केलं होतं. मात्र, आज भरत गोगावलेंची संजय राऊत यांच्यावर टीका करतांना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी सभागृहात असंसदीय शब्दाचा उल्लेख केला. गोगावलेंवनी सभागृहात शिवी वारपली, त्यावर कुणी चर्चा करत नाही. मग तुम्ही कराल ते ओके, आणि इकडनं काही झालं तर त्याचं राजकराण करायचं हे योग्य नाही, असं रोहित पवार म्हणाले,
ते म्हणाले, यापूर्वी सत्ताधारी पक्षाचे एक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रीया सुळेंच्या बाबतीत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी आम्हीही आंदोलन केलं. पण आम्ही सकाळच्या सत्रात बाहेरच्या बाजूला आंदोलनं केलं. कारण आम्हाला विधीमंडळाचं कामकाज ठप्प करायचं नव्हतं. कामकाज चालू झाल्यावरच लोकांचे प्रश्न सुटू शकतात. पण, आज तुम्ही सामान्य माणसांचे विषय मांडण्यासाठी नकार देत असाल तर याचा निषेध आहे.
Cantonment Board Election : अहमदनगर छावणी परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर…
सत्ताधारी पक्षाने ठरवून सभागृह बंद पाडलं. बेरोजगारी, वीज, व्याजदरवाढ, महागाई, शेतकऱ्यांच्या शेती पंपाचं कनेक्शन कापणं यावरून विरोधकांकडून आज हमला होणार, हे सत्ताधाऱ्यांना माहीत होतं. अशा प्रश्नांना आपल्याला उत्तरं द्यावी लागतील, त्यामुळे आजचा दिवस कसा मोडून काढता येईल, ही भाजपची खेळी होती, अशी टीकाही त्यांनी केली. पुढे ते म्हणाले, अध्यक्षांनी रुलींग दिल्यानंतर, सामान्य प्रश्नांवर चर्चा होणं गरजेचं होतं. पण, त्याच्यावर चर्चा न होता, अख्खा दिवस वाया दिवस घालवला. हिवाळी अधिवेशनात ६ हजार ८२८ प्रश्न चर्चीले जाणार होते. पण, फक्त ३६ प्रश्नांवरच चर्चा झाली. तेव्हाही सत्ताधाऱ्यांनी सभागृहाचा अख्खा एक दिवस वाया घालवला होता. त्यामुळं सत्तेतील लोकांना उत्तर देता येत नाहीत. किंवा त्यांना सामान्य लोकांचं काही देणंघेण नाही, असं दिसत असल्याचं रोहित पवार म्हणाले.