live now
Live PM Modi Mumbai Visit : दिल्लीपासून सर्व ठिकाणी डबल इंजिन सरकार द्या, मुंबई महापालिकेसाठी मोदींचे रणशिंग
LIVE NEWS & UPDATES
-
भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले
डबल इंजिन सरकार नसल्यामुळे मुंबईचा विकास थांबला. विकासासाठी दिल्ली ते महाराष्ट्र ते मुंबई एकच सरकार पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आणण्याचे सूतोवाच.
-
विकासासाठी दिल्लीपासून सर्व जागी योग्य ताळमेळ असण्याची गरज
मुंबईचा विकास होण्यासाठी सर्व ठिकाणी योग्य सरकार असण्याची गरज आहे. मागच्या काही काळात डबल इंजिन सरकार नसल्यामुळे विकासाला अडथळे आले होते. त्यामुळे विकासाठी दिल्लीपासून महाराष्ट्रापासून सर्व जागी योग्य ताळमेळ असण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदींच वक्तव्य
अप्रत्यक्षपणे मुंबई महापालिकेत भाजप सरकार द्या, महापालिका निवडणुकीसाठी मोदींच वक्तव्य
-
मुंबईच्या विकासासाठी बजेटची कमतरता नाही
मुंबईच्या विकासासाठी बजेटची कमतरता नाही. फक्त मुंबईकरांचा पैसा योग्य ठिकाणी खर्च व्हायला हवा. भ्रष्टाचार केला तर मुंबईचा विकास कसा होणार ? मोदींचा उद्धव ठाकरे गटाला टोला
-
शिंदे-फडणवीसच्या जोडीमुळे विकासाला गती
मागच्या काळात महाराष्ट्रात विकासाच्या गतीला ब्रेक लागला होता पण शिंदे-फडणवीसच्या जोडीमुळे विकासाला गती मिळाली आहे. डबल इंजिन सरकारमुळे राज्याचा जोरात विकास सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांच वक्तव्य
-
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ते प्रत्यक्षात आणण्याचा भारताचा प्रयत्न!
आता एकनाथ शिंदे दावोसचे वर्णन करत होते. सध्याचा भारत अभूतपूर्व आत्मविश्वासाने भरलेला आहे. भारत आपल्या संसाधनांचा सर्वोत्तम वापर करत आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ते प्रत्यक्षात आणण्याचा भारताचा प्रयत्न! नाहीतर आधी फक्त चर्चा होत होत्या. पंतप्रधान मोदी मुंबईमधून
-
पंतप्रधान मोदींकडून मराठीमध्ये भाषणाला सुरुवात
मुंबईमधील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये केली.
-
मेट्रो प्रकल्पाचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उदघाट्न
पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो २ आणि मेट्रो ७ प्रकल्पाचे उदघाटन
"बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" योजनेअंतर्गत २० दवाखान्याचं लोकार्पण
-
पंतप्रधान मोदींच्या नावाचा डंका दावोसमध्येही
काही दिवसापूर्वी मी दावोसला गेलो होतो, तिथे काही परदेशी लोक भेटले. त्यांनी ते पंतप्रधान मोदींचे भक्त असल्याचं सांगितलं. पंतप्रधान मोदींच्या नावाचा डंका भारतासोबत भारताबाहेरदेखील आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच वक्तव्य
-
काही लोकांना वाटत होते, या प्रकल्पाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊ नये
ज्या कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदींनी केलं, त्याचं उद्घटानही त्यांच्याच हस्ते होत आहे. अनेकांनी इच्छा होती, या कामांचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होऊ नये, मात्र, नियतीपुढे कोणाचंही चालत नाही, अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका.
https://letsupp.com/politics/eknath-shinde-in-the-name-of-asphalting-black-and-white-shops-will-close-shinde-targets-thackeray-/5912.html
-
मेट्रोच्या रूपाने मुंबईकरांचं स्वप्न साकार
समृद्धी महामार्ग जे माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होत. ते पूर्ण झालं. आता मुंबई मेट्रोच्या रूपाने दुसरं स्वप्न पूर्ण होतयं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य