Video : वडिलांना दिलेल्या वचनापुढे सचिनने नाकारले ब्लँक चेक अन् मोठ्या रकमेच्या ऑफर्स

  • Written By: Published:
Video : वडिलांना दिलेल्या वचनापुढे सचिनने नाकारले ब्लँक चेक अन् मोठ्या रकमेच्या ऑफर्स

Sachin Tendulkar Appoint Ambassador Of Clean Mouth Campaign : भारतासह अनेक देशांमध्ये स्वतःच्या खेळाने करोडोंच्या ताईत बसलेला क्रिकटाचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकरला फॉलो करणारे अनेकजण आहे. हीच बाब हेरत महाराष्ट्र सरकारने सचिनच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी दिली आहे. राज्य शासनातर्फे सचिन तेंडूलकरची निवड स्वच्छ मुख अभियानाचा ब्रँड अॅम्बेसेडरपदी करण्यात आली आहे. या कार्यक्रमावेळी सचिनने त्याच्या वडिलांना दिलेल्या वचनाची आठवण करून दिली.

Letsupp Special : विश्वस्तपद, आंदोलन अन् वाद; जेजुरीची ग्राउंड रिअ‍ॅलिटी नेमकी काय?

यावेळी बोलताना सचिनने सांगितलं की, “मी भारतासाठी जेव्हा पहिल्यांदा खेळलो, तेव्हा माझं वय १६ होतं. मी नुकताच शाळेतून बाहेर पडलो होतो. भारतासाठी खेळायला लागलो, काही जाहिरातीही केल्या. पण तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की तू तंबाखूची जाहिरात कधीच करणार नाहीस.

मी बाबांना तेव्हा वचन दिलं होतं की, कितीही काहीही झालं तरी मी तंबाखूची जाहिरात करणार नाही” 1996 साली माझी बॅट ब्लँक होती. माझ्या बॅटवर स्टीकर नव्हते. कारण तेव्हा मला तंबाखू कंपन्यांनी ऑफर दिली होती, संबंधित जाहरातींचे स्टिकर्स माझ्या बॅगेत तब्बल दोन वर्ष पडून होते. पण मी ते लावले नाहीत.

Video : या’ कारणांमुळे पेटला जेजुरी गडाच्या विश्वस्तपदाचा वाद

एवढेच काय तर, त्यासाठी मोठ्या रक्कम, ब्लँक चेकदेखील ठेवण्यात आले होते. मात्र, त्या सर्व गोष्टींना मी स्पष्ट नकार दिला. आज मला या गोष्टीचा सार्थ अभिमान असल्याचे सचिन म्हणाला. माझं आजही कोणत्याही तंबाखू कंपन्यांबरोबर असोसिएशन नाहीये. आज बाबा वरून पाहत असतील तर ( ‘स्माइल ॲंबॅसेडर’ म्हणून नियुक्ती झाल्यामुळे) आज खूप खुश असतील, अशा भावना सचिनने यावेळी बोलताना व्यक्त केल्या.

सचिन तेंडुलकरसारखा मोठा सेलिब्रिटी जेव्हा एखाध्या गोष्टीबद्दल जनजागृती करतो, त्याचा प्रचंड मोठा परिणाम तरूणाईवर होतो. त्यामुळे ते या मोहिमेसाठी अतिशय योग्य ॲंबॅसेडर ठरतील, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

https://www.youtube.com/watch?v=UTjWDwAjfUo

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube