मोक्ष देणार म्हणजे आम्ही मरणार का?; आव्हाडांच्या निशाण्यावर रामदेव बाबा

  • Written By: Published:
मोक्ष देणार म्हणजे आम्ही मरणार का?; आव्हाडांच्या निशाण्यावर रामदेव बाबा

मुंबई : तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील विधानानंतर देशातील वातावरण चांगेलच तापले असून, सनातन धर्माची बदनामी करणाऱ्यांना 2024 मध्ये मोक्ष मिळेल अशी प्रतिक्रिया योगगुरू रामदेव बाब यांनी दिली असून, रामदेव बाबांच्या या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधत मोक्ष मिळेल म्हणजे आम्ही मरणार का? असा प्रश्न केला आहे.  रामदेव बाबांना धार्मिक विषयावर महत्व देणे चुकीचे ठरेल. पण, मोक्ष देणार म्हणजे आम्ही मारणार का? असा प्रश्न विचारत सनातन धर्माची बाजू घेणाऱ्या लोकांना काही प्रश्न आहेत त्याची त्यांनी उत्तरे द्यावी असे आव्हाडांनी म्हटले आहे.

मराठवाड्यासाठी उघडली राज्याची तिजोरी; शिंदे सरकारकडून 59 हजार कोटींच्या पॅकजचे गिफ्ट

आव्हाड म्हणाले की, मोक्ष मिळणार असेल आम्ही मरणार चांगलं आहे. ‘मौत तो सबको आनि है कौन उससे छुटा है’ असे म्हणत रामदेव बाबांना सर्वांचा मोक्ष दिसत असेल ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्या आधी ज्ञानेश्वरांच्या आईला का मारले?, तुकारामांच्या गाथा नदीत का फेकल्या या आणि इतर प्रश्नांची त्यांनी उत्तरे द्यावी असे आव्हाड म्हणाले. सनातनमधूनच जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था बाहेर आली. पण जाती व्यवस्था आणि धर्म व्यवस्थेला विरोध आहे. त्यामुळे तो धर्म आम्हाला मान्य नाही तो धर्मच नाही. ती जीवन पद्धती होती आणि त्याच जीवन पद्धतीने भारताचं वाटोळं झाल्याचे आव्हाड म्हणाले.

Rohit Pawar : मला जिथे पाहिजे तिथे सगळीकडे… राणेंच्या दाढीबद्दलच्या टीकेला रोहित पवारांचे उत्तर

काय म्हणाले होते रामदेव बाबा

सनातन धर्माची बदनामी करणाऱ्यांना 2024 मध्ये मोक्ष मिळणार आहे, असे रामदेव बाबांनी म्हटले होते. तसेच सनातन संस्कृतीला प्राचीन काळापासून मान्यता आहे. आपली सनातन संस्कृती प्राचीन काळापासून ओळखली जाते असेही रामदेव बाबा म्हणाले. तर, सनातन धर्म हा भारताचा राष्ट्रधर्म असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

एक देश-एक निवडणुकीची शक्यता तुर्तास निकाली; विशेष अधिवेशनाचा सस्पेन्स मात्र कायम

शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी

यावेळी आव्हाडांनी राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावरही जोरदार टीका केली. शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी असा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. एकीकडे राज्यात शेतकरी दुष्काळग्रस्त झालेला असतानाच शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे. शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी अशी स्थिती सत्ताधाऱ्यांकडून निर्माण करण्यात आल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube