संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंची लाज काढली; लायकी दाखवणार

संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंची लाज काढली; लायकी दाखवणार

मुंबई : मनसे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (raj thackeray) यांचा शिवाजी पार्कवर (Shivaji Park)गुढीपाडवा मेळावा (Gudipadwa Melava)सुरु आहे. त्यामध्ये मनसे नेते संदीप देशपांडेंनी (Sandeep Deshpande)शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)जोरदार टीका केली आहे. त्याचवेळी देशपांडेंनी आदित्य ठाकरेंवरही (Aditya Thackeray)निशाणा साधला आहे. यावेळी देशपांडेंनी महाविकास आघाडीवरही (Mahavikas Aghadi)जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी 2014 साली लढवलेल्या निवडणुकीवरुन आणि 2019 च्या निवडणुकीवरुनही जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी संदीप देशपांडे म्हणाले की, 2014 साली तुम्ही वेगळी निवडणूक लढवली आणि पुन्हा त्या भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. बरं पाच वर्ष मांडीवर जाऊन केलं काय? तर राजीनामे खिशात घेऊन फिरत होते.

ऐश्वर्या रजनीकांतच्या दागिन्यांची चोरी करणं पडलं महागात; घरातल्या ‘या’ सदस्यावर गुन्हा

2019 साली पुन्हा त्याच भाजपबरोबर लोकसभेसाठी तुम्ही युती केली. 2019 ला विधानसभेच्या जागांवरुन तुम्हाला जेव्हा समजलं की, आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळू शकतं, त्यावेळी तुम्ही वेगळे झाले. मग शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात. पवारांच्या गुलूगुलू गप्पा केल्या. ज्या पवारांच्या विरोधात लढलात त्याच पवारांबरोबर गेलात. एवढ्या भूमिका बदलणारे तुम्ही आणि तुम्ही आम्हाल विचारताय? लाज वाटली पाहिजे तुम्हाला, एकदा चेहरा आरशात जाऊन बघा आणि मग आम्हाल प्रश्न विचारा, असा सवालही यावेळी देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना केला.

या लोकांना षड्यंत्र करायची सवय आहे. 2000 सालानंतर बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती म्हणून महाबळेश्वरच्या अधिवेशनामध्ये राज ठाकरेंनी तुम्हाला कार्याध्यक्ष केलं. स्वतः राज ठाकरेंनी त्याचा प्रस्ताव दिला आणि तो सर्वमतानं मंजूर झाला. तुम्ही काय केलत? कुठल्या प्रकारचं षड्यंत्र राज ठाकरेंच्या विरोधात कायम करत आलात. हे करण्याची तुम्हाला गरज भासली कारण तुमच्यात कर्तुत्व नव्हतं. ज्याच्याकडं कर्तुत्व आहे, त्यांना सहानुभूती घ्यायची गरज पडत नाही. राज ठाकरेंकडे कर्तुत्व आहे, त्यामुळे त्यांना तुमच्यासारखी सहानुभूती घ्यायची गरज नाही. आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि 50 खोके घेतले. हे बोलण्याची आम्हाला गरज पडली नाही.

राज ठाकरेंच्या विरोधात असं षड्यंत्र करुन अशी परिस्थिती निर्माण केली की, राज ठाकरे बाहेर पडले पाहिजेत. आणि मग अशा पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आता आली आहे. यावेळी संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरेंवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, काय म्हणाले होते आदित्य ठाकरे? मनसे पक्ष संपलेला पक्ष आहे मी त्याच्यावर बोलत नाही. याच शिवतीर्थावरुन आदित्य ठाकरे तुम्हाला सांगतो, ज्या पक्षाला तुम्ही संपलेला पक्ष म्हणतात ना, याच मनसेचा सैनिक तुम्हाला तुमची लायकी आणि औकात दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंना दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube