Sanjay Raut : संसद म्हणजे मोदींचे मल्टिप्लेक्स, संजय राऊतांचा निशाणा

  • Written By: Published:
Sanjay Raut : संसद म्हणजे मोदींचे मल्टिप्लेक्स, संजय राऊतांचा निशाणा

मुंबई: नव्या संसद भवनातील पहिल्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. नवीन संसद भवनात खासदारांसाठी असलेल्या सुविधांवरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. नवीन संसद भवन म्हणजे मोदी मल्टिप्लेक्स आहे. मला ही संसद अजिबात वाट नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

अहमदनगर : मतदारसंघ राष्ट्रवादीकडे अन् शक्तिप्रदर्शन भाजपचे! बावनकुळेंची पदाधिकाऱ्यांसह खलबत 

संजय राऊत म्हणाले, संसदेमधील नियम हे सर्वांना एकच असले पाहिले. संसद हे कुठल्या एका ग्रुपचे नाही. कोणाच्या विचारधारायचे नाही. एखाद्या खासदारावर थेट खालच्या भाषेत, जाती, पंथावरून बोले जाते. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी त्या भाषासंदर्भात माफी मागितली आहे. मात्र  हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद ज्येष्ठ नेते बाजूला बसणारे लोक हसत होते. जात-धर्मावरती टिप्पणी केली जाते, अशी व्यक्ती संसदेमध्ये नसली पाहिजे. हे शोभा देत नाही.


नागालँडचे आमदार मुंबईत येणार; अजितदादांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच होणार राष्ट्रीय शक्तिप्रदर्शन

आपल्या देशात नवीन संसदमध्ये नवीन संसद संविधान हे आपली जबाबदारी आहे. पण नवीन संसद म्हणजे मोदी मल्टिप्लेक्स
असल्याचे वाटत आहे. या संसदेत आतमध्ये गेले की असे कळते की असते एखाद्या मल्टिप्लेक्सच्या पद्धतीचे संसद मला वाटते, असे संजय राऊत म्हणाले.

नवीन संसदेत खासदारांसाठी कुठल्याची सुविधा नसल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला. राऊत म्हणाले, जुन्या संसदमध्ये गेल्यावर वाटते की ऐतिहासिक संसदमध्ये आलो आहे. मात्र या नवीन ठिकाणी असे जाणवत नाही. हजारो कोटी रुपये खर्च केलेले आहे. परंतु खासदारांसाठी कुठलेही सुविधा नाहीत. लॉबी नाही, सेंट्रल हॉल नाही, उत्तम लायब्ररी नाही. मग बनवली कशासाठी ? तुमच्या सोयीसाठी? तुमच्या राजाच्या मनात एक लहर आली एक संसद बनवलं, असल्याची टीकाही राऊत यांनी केले आहे.


सरकारवर अंधश्रद्धा, ग्रह आणि कुडलीचा पगडा

जुने संसद भवन अजूनही ५० ते १०० वर्ष टिकून शकते, एवढे मजबूत आहे. तरीही नवीन संसद उभारण्यात आल्याने दिल्लीत त्याबाबत दिल्लीत मजेदार चर्चा सुरू आहेत. काही चर्चा मनोरंजक आहेत. दिल्लीचे सरकार हे अंधश्रद्धा आणि अंधभक्तांच्या वर्तुळात फिरत आहे. सरकार चालवणाऱ्यांवर अंधश्रद्धा, ग्रह आणि कुंडलीचा पगडा असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube