Shambhuraj Desai : शंभूराज देसाईंनी भास्कर जाधवांना डिवचले…. व्हीप तोडला तर बघा..
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) आज सुरुवात झाली. शिंदे गटाने शिवसेना आमदारांना व्हीप बजावला आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आम्ही या व्हीपला भीक घालत नसल्याचे म्हटले आहे. यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत पक्षादेशाचं उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा अधिकार मुख्य प्रतोदांना आणि गटनेत्यांना असल्याचे म्हटले आहे.
शिवसेना पक्ष (ShivSena) आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला मिळाले आहे. विधानसभेच्या वर्षातील तिन्ही सत्रांसाठी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी पक्षाचा आदेश प्रत्येक प्रतिनिधीला दिला जातो. सभागृहातील उपस्थिती, चर्चेतील सहभाग, एखाद्या बिलावर मतदान करण्याची वेळ आली तर त्याबाबदचा पक्षादेश आमदारांना दिला जातो. त्यामुळे संसदीय कामकाजाचा भाग म्हणून सर्व 56 आमदारांना शिवसेनेकडून व्हिप बजावला आहे, असे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असताना पक्षाकडून एवढं सांगितले होते की जर व्हिपचं उल्लंघन झालं तर त्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचा आदेश येईपर्यंत किंवा पुढची तारीख होईपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, असे स्टेटमेन्ट आम्ही सुप्रीम कोर्टासमोर केले होते. त्यामुळे तुर्तास कारवाई करणार नाही, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.
Maharashtra Politics : ‘शिंदे गटाचे घोटाळे…., संदीपान भुमरेंनी आदित्य ठाकरेंना सुनावलं
सुप्रीस कोर्टातील दोन आठवड्याचा कालावधी उलटल्यावर जर उल्लंघन झालं तर कारवाई केली जाईल का? या प्रश्वांवर देसाई म्हणाले, विधानसभेत पक्षादेशाचे उल्लंघन झाले तर कारवाई करण्याचे अधिकार मुख्य प्रतोदांना आणि गटनेत्यांना असतात. जर या व्हिपचं उल्लंघन झालं तर एक अहवाल तयार करुन सुप्रीम कोर्टाच्या पुढील तारखेला निर्दशनास आणू. उल्लंघन केलं असेल किंवा केलं नाही तरी देखील कोर्टाच्या निर्दशनास आणू, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.