‘संजय राऊत हा राजकारणातला जोकर…? संजय शिरसाटांची जोरदार टीका

‘संजय राऊत हा राजकारणातला जोकर…? संजय शिरसाटांची जोरदार टीका

मुंबई : मुंबईमध्ये २९ जानेवारी रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. शिवसेना (shiv sena) भवनाच्या परिसरात हा मोर्चा काढण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावले होते. यावरून चर्चेला उधाण आलेलं असताना दुसरीकडे सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटानं या मोर्चेकऱ्यांवर जोरदार शब्दांत टीका केली. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( sanjay raut) यांनी मोर्चा काढणाऱ्यांवर टीका केली आहे. तसेच आता यावरून संजय राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनाच टोला लगावला आहे.

आजच्या सामनाच्या मुख्यपृष्ठावर वरील पानात मोठ्या छायाचित्रासह राहुल गांधींची बातमी आणि त्याच पृष्ठावर खाली हिंदू जनआक्रोश मोर्चाची बातमी लावण्यात आल्याने, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. संजय शिरसाट म्हणाले, मी सतत सांगत आलोय की, संजय राऊत हा वेडा माणूस आहे. आजच्या घडीला संजय राऊत हा राजकारणातला जोकर झाला आहे. तो नेमकं काय करतोय, हे त्याला सुद्धा माहिती नाही. संजय राऊत हा असा व्यक्ती आहे की, राहुल गांधींचा फोटो आणि शरद पवारांचा फोटो हा शिवसेना भवनात लावायला कमी करणार नाही. असे यावेळी संजय शिरसाट म्हणाले.

याबरोबरच, सर्वधर्म समभावाची व्याख्या त्याला पाठ झाली आहे. ज्याचा विरोध शिवसेना प्रमुखांनी केला होता, जे गाडलेले मुडदे आहेत, त्यांना जिवंत करण्याचं काम हा संजय राऊत करत आहे. म्हणून संजय राऊतला आणखी हिंदुत्व कळायला खूप कालावधी आहे. शिवसेना संपली असं समजूनच तो अशी वक्तव्य करत आहे. आता कदाचित शेवट काय करायच आहे, या विवंचनेत तो सुद्धा असल्याची टीका संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube