पण मुलगी? ती निस्वार्थपणे पाठीशी उभी राहते ? शिवदीप लांडे यांची पत्नी ममतासाठी खास पोस्ट

Shivdeep Lande-तुझ्या वडिलांसाठी असलेल्या तुझ्या निस्वार्थ समर्पणाला, त्यागाला आणि दृढनिश्चयाला माझा सलाम

  • Written By: Published:
Shivdeep Lande Vs Mamta Lande

Shivdeep Lande Emotional Post to wife Mamata : माजी मंत्री व पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांना मुलगी डॉ. ममता शिवतारे-लांडे (Mamata Shivtare) हिने किडनी दान करत जीवदान दिले आहे. सोमवारी मुंबईत किडनी प्रत्यार्पणाची शस्त्रक्रिया पार पडलीय. डॉ. ममता या माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांच्या पत्नी आहेत. शस्त्रक्रियानंतर शिवदीप लांडे यांनी पत्नीसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

मी आयुष्यात अनेक अडचणींना तोंड दिले आहे, संकटांनी मला घेरले आहे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीसुद्धा मला कधीच विचलीत करू शकली नाही. मी नेहमीच खंबीर राहिले आहे. पण तुझ्या एका निर्णयाने मला हादरवून सोडले. जेव्हा तू तुझ्या वडिलांना नवीन जीवन देण्यासाठी तुझी किडनी दान करण्याचा निर्णय घेतलाय, तुझ्या वडिलांसाठी असलेल्या तुझ्या निस्वार्थ समर्पणाला, त्यागाला आणि दृढनिश्चयाला माझा सलाम, असे शिवदीप लांडे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

गेल्या तीन महिन्यांत… ऑपरेशनसाठी आवश्यक असलेल्या डझनभर वैद्यकीय चाचण्या, हजारो कागदपत्रांचा गुंता, कायदेशीर अडचणी हे सर्व तू एकटीने सांभाळले. मी फक्त एक मुका प्रेक्षक, तुला पाहत, आणि विचार करत होतो की देव एखाद्याच्या आयुष्यात मुलगी का पाठवतो? कदाचित आज मला या प्रश्नाचे उत्तर सापडले: की कदाचित आईची सोबत फक्त एका ठराविक काळापुरतीच टिकते आणि देव त्या आईची पोकळी आयुष्यभर मुलीच्या रूपात भरून काढतो. आयुष्यभर.

आज, मुंबईच्या त्या आयसीयूमध्ये… किडनी प्रत्यारोपणानंतर… तुझ्या शेजारी बसून, तुझ्या निरागस चेहऱ्याकडे बघताना, माझ्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू… थांबतच नाहीत. का? हे अश्रू का थांबत नाहीत? आज मला समजलं. नातेवाईकांमध्ये, भाऊ तुला सोडून जातो, मुलगा पाठ फिरवतो, बहीण तोंड फिरवते, अगदी बायकोसुद्धा… या जीवन-मरणाच्या रणांगणात तुला सोडून जाते. पण मुलगी? ती निस्वार्थपणे तुझ्या पाठीशी उभी राहते. अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता.
गौरी, तुझे डोळे मिटलेले आहेत. पण तुझं प्रेम, तुझा त्याग प्रत्येक वडिलांना शिकवतो की मुलगी हे देवाने त्यांना दिलेले सर्वात मोठे वरदान आहे, असे शिवदीप लांडे यांनी म्हटलंय.

follow us