Mumbai APMC वर प्रशासक मंडळ येणार, अध्यक्षपदावरून भाजप-शिवसेनेमध्ये रस्सीखेच?
Mumbai APMC : कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण भागात राजकारणाचं महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण त्यातून तेथिल राजकारणात राजकीय नेत्यांनी जम बसवलेला असतो. त्यामुळे सध्या देश आणि राज्यात गावापासून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने कंबर कसायला सुरूवात केली आहे. याचाच प्रत्यय आला आहे मुंबई बाजार समितीमध्ये. मुंबई बाजार समिती बरखास्तीच्या हालचाली सुरू झाल्या असून आता लवकरच मुंबई बाजार समितीवर भाजप शिवसेनेचे प्रशासक मंडळ येणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला आहे. यानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर यांसारख्या मोठ्या बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी भादप शिंदेंकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 10 संचालक अपात्र ठरले आहेत.त्यामुळे संचालक मंडळातील सदस्य जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याचं संचालक विनायक केकरे यांनी सांगितलं. तर संचालक मंडळ बरखास्त का करू नये? अशी नोटीस देखील पणन संचालकांनी बाजार समितीच्या संचालकांना पाठवली आहे.
त्यामुळे आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळातील सदस्य जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याच्या मुद्द्यावरून संचालक मंडळ बरखास्त करून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी भादप शिंदेंकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
Sheetal Mhatre : लाचारांची स्वारी ‘सिल्व्हर ओक’च्या दारी…
दरम्यान पणन संचालकांनी पाठवलेल्या नोटीसला 18 एप्रिलपर्यंत लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आला आहे. तर खुलासा न केल्यास त्यांच्यावर पणन कायद्यानुसार कारवाई देखील होऊ शकते. तर पणन मंत्रालयाबद्दल सांगायचे झाले तर या मंत्रालायाचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.
तर सहकार मंत्रालयाचा कारभार भाजपकडे असल्याने दोघांकडून अध्यक्षपदासाठी आपल्या पक्षाच्या व्यक्तीची वर्णी लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे भाजप- शिवसेनेमध्ये या बाजार समितीच्या अध्यक्षपदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.