BBC Documentary : धक्कादायक! बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाचे पुण्यात स्क्रीनिंग

  • Written By: Published:
BBC Documentary : धक्कादायक! बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाचे पुण्यात स्क्रीनिंग

पुणे : गुजरात दंगलीवर आधारित असलेली बीबीसीची (BBC) ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ डॉक्युमेंट्री (‘India: The Modi Question’ Documentary) वादात सापडली आहे. केंद्र सरकारने यूट्यूबवरील व्हिडिओ आणि ट्विटर लिंक ब्लॉक केल्या आहेत. असे असताना देखील पुण्यातील एफटीआयआय कॅम्पसमध्ये डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे केंद्र सरकारची बंदी असतानाही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेमध्ये (एफटीआयआय) दाखविण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे एफटीआयआय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एफटीआयआय स्टुडंटस असोसिएशनतर्फे प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी विसडम ट्रीजवळील मोकळ्या जागेमध्ये हा माहितीपट दाखविण्यात आला. संगीत, माहितीपट किंवा चित्रपटावर अशा प्रकारे बंदी घालू शकत नाही. ते दाखविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे, यासाठी आम्ही माहितीपटाचे प्रदर्शन करून त्याविरोधातील बंदीचा निषेध केल्याचा दावा स्टुडंट्स असोसिएशनने केला आहे. त्यामुळे आता यावरुन पुण्यात देखील पुन्हा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माहितीपट बनवणाऱ्यांनी त्यांच्या दृष्टीकोनातून माहितीपट बनवला आहे. FTII मध्ये जेव्हा माहीतपट दाखवण्यात आला. तेव्हा माहितपट पाहून चांगले वाटल्याची प्रतिक्रिया FTII च्या विद्यार्थांनी दिली आहे. जेव्हा माहितीपटाचे स्क्रिनिंग झाले तेव्हा आम्ही 100 विद्यार्थ्यांनी एकत्र माहितीपट बघितल्याची माहिती फिल्म अण्ड टेलिव्हिजन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube