आता खरी लढाई सुरू ;  Shubhangi Patil यांचा ठाकरे गटात प्रवेश, पक्षात मोठी जबाबदारी मिळणार

आता खरी लढाई सुरू ;  Shubhangi Patil यांचा ठाकरे गटात प्रवेश, पक्षात मोठी जबाबदारी मिळणार

मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आणि शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. राज्याच्या राजकारणात चर्चा होत असलेल्या विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik) अपक्ष असलेल्या सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा पराभव केला. शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता.

एका सामान्य घरातील मुलीला इतकी मतं मिळाल्याबद्दल शुभांगी पाटील यांनी मतदारांचे आभार मानले. तसेच आता आम्ही थांबणार… असं त्यांनी यावेळी म्हणाले. आज शुभांगी पाटीला यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. आता मी शिवसैनिक म्हणून लढणार, आम्ही सगळे एक आहोत, एक राहू असं पक्षप्रवेशानंतर शुभांगी पाटील यांनी सांगितलं. सर्वानी माझ्यावर जबाबदारी दिली होती, ती मी पूर्ण करेन असे देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

कुठे तरी मी कमी पडली असणार, नाना पटोले, जयंत पाटील, अजित दादा, शरद पवार, उद्धव ठाकरे सगळ्यांचा आधार होता असे देखील शुभांगी पाटील यांनी सांगितल. शुभांगी पाटील यांनी अधिकृत शिवबंधन बांधून शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये पक्ष प्रवेश केला आहे. लवकरच त्यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी दिली जाणार, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. शुभांगी पाटील अत्यंत जोमाने लढल्या अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube