मनसुख हिरेन हत्या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Mansukh Hiren murder case : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणी आणि उद्योजक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी (Mansukh Hiren murder case) अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस कर्मचारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी जामीन मंजूर केला.

25 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन आढळून आले. हे वाहन व्यापारी मनसुख हिरेन यांचे होते आणि हिरेन 5 मार्च 2021 रोजी ठाण्यात मृतावस्थेत आढळून आले होते.

Lok Sabha Elections ; ‘आघाडीचा बसपाला नेहमीच तोटाच’, मायावतींनी दिला स्वबळाचा नारा

शर्मा हे पोलिस अधिकारी दया नायक, विजय साळसकर आणि रवींद्रनाथ आंग्रे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या एन्काउंटर पथकाचे सदस्य होते. या पथकाने 300 हून अधिक गुन्हेगारांना अनेक चकमकीत ठार केले होते. साळसकर यांचा 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन सापडून हरेन यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाढे हा मुख्य आरोपी आहे.

बंडखोरी, राज्यभर दौरा अन् जाहीर सभेत टीका; शरद पवारांच्या मनात नेमकं काय? रोहित पवारांनी सांगितलं

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने शर्मा यांच्या बाजूने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील मुकल रोहतगी आणि राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे (एनआयए) हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 21 ऑगस्ट रोजी हा निर्णय दिला. निकाल राखून ठेवला होता. याप्रकरणी शर्माला जून 2021 मध्ये अटक करण्यात आली होती.

https://youtu.be/DqfUTpGFTv0

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube