कार्यकर्त्याला पाठबळ नाही मिळालं तर खच्चीकरण होतं, मुख्यमंत्री शिंदेंची टीका
कार्यकर्त्याला पाठबळ नाही मिळालं तर खच्चीकरण होतं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केलीयं. दरम्यान, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
Delhi Crime : दिल्ली हादरली! लग्नाला नकार देणं विद्यार्थीनीला महागात पडलं, लोखंडी रॉडने…
सातमकर म्हणाले, शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच चाललीयं, अडचणीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे हे शिवसैनिकांच्या खंबीरपणे पाठीशी राहायचे. आता शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले आहे. त्यामुळेच शिंदे गटात प्रवेश केल्याचं सातमकर यांनी स्पष्ट केलं आहे.
माजी नगरसेवक सातमकर हे शीव येथील प्रभाग क्रमांक १७५ मधून २०१७ मध्ये चौथ्यांदा निवडून आले होते. महापालिकेच्या शिक्षण समितीवर ते चार वेळा अध्यक्ष होते. २००७ मध्ये शिक्षण समिती अध्यक्ष असताना पालिकेच्या शाळांतील विद्यार्थांना २७ शालेय वस्तू आणि सुगंधी दूध हे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले होते.
पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना…
पब्लिक स्कूलची योजनाही त्यांनीच राबविली होती. स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, सभागृह नेता आणि अशा महत्त्वाच्या पदाच्या शर्यतीत होते. मात्र त्यांना प्रत्येक वेळेला डावलले गेले. काही वर्षांपासून ते नाराज होते. आज अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला आहे. ते म्हणाले, कार्यकर्त्यांच्या संकटकाळात काही अपेक्षा असतात. नेत्यांनी नैतिक पाठिंबा द्यावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. तसा पाठिंबा त्यांना मिळाला नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी सातमकर यांचं पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या भागातील प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याची ग्वाहीच मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे.