Uddhav Thackeray: दुसऱ्याचे वडील चोरताचोरता स्वत:चे वडील लक्षात ठेवा
मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार शरद पवार यांच्यावर आरोप करून पाडलं आणि काल हे त्यांचंच कौतुक करत आहेत. मी त्यांच्याकडून मार्गदर्श घेतो म्हणत आहेत. मग मी काय करत होतो? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली.
मुंबईतील माटुंगा येथे ष्णमुखानंद सभागृहात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
आज विधानभवनात तैलचित्र लावलं जातंय. मला दुपारी विचारलं तैलचित्राबद्दल गेलं पण ते मी पाहिलेलं नाही. पण ज्या चित्रकाराने हे चित्र रेखाटलंय त्याला वेळ दिला होता का? घाईगरबडीत काही तरी रंगवायचं आणि हे तुझे वडील, हे चालणार नाही. यापूर्वी मी त्यांना वडील चोरणारी औलाद म्हटलं होत पण वडील चोरताचोरता त्यांनी स्वत:चे वडील लक्षात ठेवावेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
इकडं बाळासाहेबांचे विचार, तिकडं गेलं की मोदी का आदमी वरुन शरद पवार गोड माणुस म्हणायचं. तुम्ही नक्की कोणाचे फोटो लावणार आहात. महाविकास आघाडी सरकार का पडलं? हिंदूत्व सोडलं आणि शरद पवारांच्या आहारी गेले. काल काय सांगत होते? शरद पवार खुप गोड माणुस आहे. मी त्यांच मार्गदर्शन घेतो. मग मी काय करत होतो? असा अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
दोन-तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. त्यावेळी त्यांनी काही कामांचं उद्धघाटन केलं. परंतु, आम्ही सुरू केलेल्याच कामांच उद्घाटन त्यांनी केलं. पंतप्रधान उद्या येणार म्हणून रात्री ही कामं सुरू झाली नाहीत. गेले तीन वर्षे आम्ही ही कामं करत होतो म्हणून तुम्ही आता त्याचं उद्घाटन करून गेले, अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.