Uddhav Thackeray: देश हुकुमशाहीच्या दिशेने चालला, हिंदुत्व वगैरे थोतांड
मुंबई : देश हुकुमशाहीच्या दिशेने चालला आहे. हिंदुत्व वैगरे थोतांड आहे. हिंदुत्वाच्या आधारे धोक्याची भींत उभारून देशावर पोलादी पकड घट्ट बसवायची, अशी बसवायची की तुम्ही हू की चू केलं तर याद राखा, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर केला.
शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त मुंबईतील षण्मुखानंद समागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिंदे गटावरही (Shinde group) हल्लाबोल केला आहे.
गद्दार विकले जाऊ शकतात, विकत घेता येऊ शकतात. खरे शिवसैनिक विकले जाऊ शकत नाहीत. संजय राऊतला काही देशाचे पंतप्रधान भेटले पण मला अमेरिकेचा अध्यक्ष भेटला. ते म्हणाले उद्या मी भाजपात चाललोय. कारण त्यांच्या घरावर एफबीआयने रेड टाकलीय. काही कागदपत्रं सापडली. त्यावेळी आपल्याकडचे काही खोकेवीर त्यांना भेटले.
आता तु असा कसा जगणार? भाजपात ये किंवा मिंद्दे गटात ये म्हणजे निवांत झोप येईल. त्यामुळे अमेरिकेचा अध्यक्ष भाजपात किंवा मिंद्दे गटात गेले तर आश्चर्य वाटयला नको, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख ( ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर केली.
आज प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले. काही दिवसांपूर्वी रामदास आठवले आणि मी एकत्र आलो होतो. त्यावेळी आठवले म्हणाले होते की तुम्ही प्रबोधनकारांचे नातू आणि आम्ही त्यांचे वैचारिक नातू. तेव्हा मी त्यांना म्हणालो की आपण एकत्र येऊ या. आणि ते गेले त्यांच्या कळपात. आणि आज खऱ्या अर्थाने विचाराचे आणि रक्ताचे नातू एकत्र आले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.