Pune-Nashik साठी महत्वाची बातमी; खुद्द फडणवीस यांनी ट्विट करून दिली…

Pune-Nashik साठी महत्वाची बातमी; खुद्द फडणवीस यांनी ट्विट करून दिली…

मुंबई : बहूप्रतिक्षित पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे (Pune-Nashik High Speed ​​Rail) प्रकल्पाला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे.

याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करून दिली आहे. अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

या प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारची कंपनी आणि रेल्वे विभागाची संयुक्त बैठक होईल. त्यामधील टेक्निकल अडचणी दूर करून केंद्रीय मंत्रिमंडळाकडे हा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठवला जाईल. आज या प्रकल्पाला मिळेली तत्वतः मंजुरी हे दोन्ही शहराच्या विकासात माईलस्टोन ठरेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, पुणे-नाशिक हे दोन्ही शहरं महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची शहरं आहेत. या दोन्ही शहरांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. आर्थिक दृष्टीने दोन्ही शहरं महत्वाची आहेत. या दोन्ही शहरांना रेल्वेने जोडणारा हा प्रकल्प मंजूर व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी मेहनत घेतली आहे. या प्रकल्पातील जे काही टेक्निकल अडचणी होत्या त्यावर सविस्तर चर्चा झाली. आणि हा प्रकल्प गतीने पुढं घेऊन जाऊ, त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube