ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले (Senior Journalist Vijay Bhosale) यांचे आज (सोमवारी) हृदयविकाराच्या (Pimpri News) धक्क्याने निधन झाले आहे. त्यांचे वय ६५ होते. पिंपरी-चिंचवड शहर पत्रकारितेत गेले अनेक वर्षे ते कार्यरत होते. शहरातील दै. केसरीचे सर्वात जेष्ठ, आणि गेली 25 वर्षापेक्षा अधिक काळ विधिमंडळ वार्तांकन करणारे पत्रकार विजय भोसले (वय-६५) यांचे अल्पशा (Vijay Bhosale) आजाराने आज सकाळी निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

दोनच दिवसांपूरर्वी भोसरी येथील एका खासगी हॉस्पिटलचे उद्घाटन कार्यक्रमात त्यांना भोवळ आली म्हणून वायसीएम मध्ये दाखल केले होते. मूळचे सातार जिल्ह्यातील औंध येथील रहिवासी असलेले भोसले हे गेली ४० वर्षे पत्रकारितेच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झाले होते. अत्यंत अभ्यासपूर्ण, आक्रमक, मुद्देसूद लिखाण शैली असल्याने त्यांची राजकारणात एक जरब होती.

शहरात नगरपालिकेच्या स्थापनेपासून सर्व घडामोडींचे ते साक्षिदार होते. महापालिकेतील अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा त्यांनी पर्दाफाश केला होता. मंत्री, खासदार, आमदार आणि आजवरचे सर्व महापौर, नगरसवेकांमध्ये एक स्वतंत्र निर्भीड बाण्याचे हाडाचे पत्रकार अशी त्यांची ओळख अखेर पर्यंत कायम होती. गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ मुंबई आणि नागपूर मध्ये त्यांनी विधिमंडळाचे वार्तांकन केले. त्यांचे अभ्यासपूर्ण लेख आणि राज्याच्या राजकारणावरील विश्लेषण गाजले. विजय भोसले यांच्या निधनावर राजकीय नेत्यांनी हळहळ व्यक्त केली.

केसरीचे ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पिंपरी-चिंचवड येथील नेहरूनगर स्मशानभूमीत सायंकाळी 6.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube