शिवसंवाद यात्रेला उत्तर देण्यासाठी आशीर्वाद यात्रेची जोरदार सुरुवात, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

शिवसंवाद यात्रेला उत्तर देण्यासाठी आशीर्वाद यात्रेची जोरदार सुरुवात, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)गटानं जाहीर केलेल्या शिवसंवाद यात्रेला (Shivsanvad Yatra) प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना शिंदे गट (Shinde Group)आणि भाजप (BJP)युतीनं आशीर्वाद यात्रेचं आयोजन केलंय. त्याची सुरुवात आज घाटकोपर (Ghatkopar)येथून झाली. जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजप, शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला घाटकोपर पश्चिम अमृतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जोरदार सुरुवात झालीय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)हे यात्रेत सहभागी झाले आहेत.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, खासदार मनोज कोटक यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येतून आणलेला धनुष्यबाण उंचावत यात्रेची सुरुवात झाली. यावेळी हजारोंच्या संख्येनं भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले. एकूण सहा लोकसभा मतदार संघातून ही यात्रा निघणारंय.

शरद पवारांकडून नाना काटेंसह राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना सूचना, म्हणाले…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत जवळपास 10 हजारांहून अधिक कार्यकर्ते दुचाकीवर स्वार होऊन भाजपा-शिवसेना झेंडा फडकवत सहभागी झाले. यात्रा मुलुंड बाळराजेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली होती.

यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, ‘जप आणि शिवसेना सोबत असून धनुष्यबाण चिन्ह आणि बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व आमच्याबरोबर आहे याचा आनंद आहेच, तसा आनंद जनतेलाही आहे. जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठीच ही यात्रा असल्याचंही ते म्हणाले. यावेळी आमदार राम कदम, आमदार मिहीर कोटेचा, आमदार पराग शाह यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेची घोषणा केल्यानंतर भाजपकडून आशीर्वाद यात्रेची घोषणा करण्यात आली. शिवसंवाद यात्रेतून शिंदे गट, भाजप यांच्यावर निशाणा साधणार आहेत. त्याला आशीर्वाद यात्रेतून उत्तर दिलं जाणार असल्याचं सांगितलं जातंय. आजपासून सुरू झालेली आशीर्वाद यात्रा मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये यापुढं 9 आणि 11 मार्च रोजी प्रत्येकी दोन लोकसभा क्षेत्रामध्ये आशीर्वाद यात्रा मार्गक्रमण करणारंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube