खासदार राहुल शेवाळे यांना सुषमा अंधारे भिडल्या : त्या महिलेची you tube वर मुलाखत
मुंबई : काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळेंविरोधात (MP Rahul Shewale) लैंगिक अत्याचाराचा आरोप फॅशन डिझायनर रिंकी बक्सल (Rinky Buxal) यांनी केला होता. या संदर्भात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रिंकी बक्सल यांची मुलाखत घेतली. सत्तेचा दुरुपयोग करून लेकी बाळीचे शोषण करणाऱ्या आमदार खासदारांना कुणाचाही धाक नाही का? असा सवाल शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
सुषमा अंधारे यांनी रिंकी बक्सल यांना विचारले की, ‘तुम्ही खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बरेच आरोप केले आहेत. पण ते आरोप आहे की सत्य? यावर बोलताना रिंकी बक्सल म्हणाल्या, मी आरोप केले नाहीत. सत्य परिस्थिती सांगितली आहे. माझं त्यांनी मानसिक आणि शारीरिक शोषण केलं आहे. पण 28 एप्रिल 2022 पासून माझी कोणतीही तक्रार दाखल करुन घेतली नाही’.
‘आमची पहिली ओळख दिल्लीतील त्यांच्या ऑफिसात झाली होती. मला त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यांचा पत्नीसोबत घटस्फोट होणार आहे. मुलांसाठी मजबूरीने पत्नीसोबत राहत. तु मला साथ दिली तर मी आपल्या लग्नासाठी प्रयत्न करतो. त्यांच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवला,’ अशी फसवणूक केल्याचे रिंकी बक्सल यांनी सांगितले.
रिंकी बक्सल म्हणाल्या, ‘आम्ही जयपूरला फिरण्यासाठी गेलो होतो. तिथं गेल्यावर शारीरिक संबंधाची मागणी केली. मी नकार दिल्यावर माझ्यावर दबाव आणला. माझं करिअर खराब करण्याची धमकी दिली, कुटुंबाला इजा पोहचवण्याची भीती दाखवली अशा पद्धतीने माझं सातत्याने शोषण केलं’, असा आरोप खासदार शेवाळे यांच्यावर केला आहे.
महिला सुरक्षा आणि महिला सन्मानाच्या गप्पा मारणारी सरकार किंवा राजकीय मंडळी खरोखरच महिलांच्या सुरक्षिततेबद्दल विचार करतात का? एखादी महिला खरं बोलते की खोटं बोलते किमान हे समजून घेण्यासाठी तरी त्याची चौकशी करावी असं सरकारला का वाटत नसेल ?
सत्तेचा दुरुपयोग करून लेकी बाळीचे शोषण करणाऱ्या आमदार खासदारांना कुणाचाही धाक नाही का? असा सवाल शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.