Nawab Iqbal Mehmud : अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळून काय होणार?
उत्तर प्रदेशात बारावीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळून काय होणार? असा खोचक सवाल समाजवादी पार्टीचे आमदार नवाब इकबाल मेहमुद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात आता बारावीच्या विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नसल्याचा निर्णय योगी सरकारकडून घेण्यात आला आहे.
Eknath Shinde : सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून संभाजीनगरमध्ये बसले
भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार विषय कमी करण्यात आला आहे. आता योगी सरकारच्या या निर्णयामुळे वाद होण्याची शक्यता आहे. या निर्णयावरुन सपाचे आमदार नवाब इकबाल मेहमुद यांनी खोचक टोला लगावला आहे.
‘बागेश्वर बाबावर मंत्री विखे भडकले.. म्हणाले, बाबाचे वक्तव्य निव्वळ थोतांड, अशा लोकांवर..
उत्तर प्रदेश बोर्डासह सीबीएसई बोर्डाचाही अभ्यासक्रम योगी आदित्यनाथ सरकारकडून बदलण्यात आला आहे. इतकंच नाहीतर 11 वीच्या पाठ्यपुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतीत झालेले मतभेद, औद्योगिक क्रांती यांसारखे धडेही वगळण्यात आले आहेत. योगी सरकारचा हा निर्णय चालू वर्षांपासून लागू करण्यात येणार आहे.
अखेर काँग्रेसचं ठरलं ! Rahul Gandhi सूरतला जाणार; ‘त्या’ निर्णयाला देणार आव्हान
दरम्यान, या निर्णयावर सपाचे आमदार मेहमुद संतापल्याचं दिसून आलं असून मुस्लिमांविरोधात भाजपला जे करता येईल ते सगळ भाजप करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. मात्र, मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून वगळून होणार काय? मुघल काळात भारताने खूप प्रगती केल्याचं कसं विसरता येईल, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
Horoscope Today: नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल ! जाणून घ्या कसा असेल आजचा तुमचा दिवस
याआधीही योगी सरकारने मुघलांच्या इतिहासाबाबत अनेक निर्णय घेतलेत. उत्तर प्रदेशातल्या आग्रामधील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असं नामकरण त्यांनी केलं आहे.
आग्रामध्ये निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाईल, तुमच्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेच्या प्रतिकांना स्थान नाही. जय हिंद जय भारत…असं ट्विटही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यावेळी केलं होतं.