सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! पगारात 34 टक्क्यांनी वाढ होणार? आठव्या वेतन आयोगाची लगबग
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून 8 व्या वेतन आयोगानुसार त्यांच्या पगारात 34 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
8 th pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची समोर येत आहे. कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाबाबत (8th-pay-commissio) मोठी अपडेट समोर आलीयं. आयोग 2.57 फिटमेंट फॅक्टर ठेवण्यावर विचार करत असून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महागाई भत्त्यातील वाढीची घोषणा केंद्र सरकार याच आठवड्यात करण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे सुमारे 49 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे.
क्लिकवर ड्रग्स घरपोच! ‘पोर्टर’ ॲपद्वारे पुण्यात सुरू होता अमली पदार्थांचा अवैध व्यवसाय उघड
सरकार यावेळी महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करू शकते. सध्या हा भत्ता ५८% आहे, जो वाढून आता ६१% होईल. ऑक्टोबर २०२५ मध्ये महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला होता, जो १ जुलै २०२५ पासून लागू झाला होता. वाढत्या महागाईचा कर्मचाऱ्यांच्या क्रयक्षमतेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सरकार वर्षातून दोनदा (जानेवारी आणि जुलै) या भत्त्यात सुधारणा करते.
Iran War : गर्जना युद्धाची की सुप्त थकव्याची? ट्रम्प यांच्या 18 मिनिटांच्या भाषणाचं सखोल विश्लेषण!
केवळ पगारवाढच नाही, तर कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचा एरिअर (थकीत रक्कम) देखील मिळण्याची शक्यता आहे. वरील उदाहरणातील कर्मचाऱ्याला एप्रिलच्या पगारासोबत सुमारे ६,७३२ रुपये अतिरिक्त मिळू शकतात. अर्थात, ही रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मूळ पगारावर अवलंबून असेल.