मोबाईल पाण्यात पडला; जलाशय 3 दिवस 30 एचपी पंपानं उपसला; अधिकाऱ्याच्या प्रतापाने संतापाची लाट

मोबाईल पाण्यात पडला; जलाशय 3 दिवस 30 एचपी पंपानं उपसला; अधिकाऱ्याच्या प्रतापाने संतापाची लाट

21 lakh liters of reservoir water emptied for mobile, food inspector suspended after ruckus : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात एका सरकारी अधिकाऱ्याने 1 लाख रुपयांच्या मोबाईल फोनसाठी जलाशयातून 21 लाख लिटर पाणी बाहेर उपसले. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनाने अन्न निरीक्षक राजेश विश्वास (Rajesh vishwas) यांना निलंबित केले आहे. त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या एसडीओंनाही राजेश विश्वास यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

काय प्रकरण आहे?

कांकेरमधील पाखंजूर येथील खेरकट्टा परळकोट जलाशयात अन्न निरीक्षकाच राजेश विश्वास यांचा महागडा फोन पडला. त्या मोबाईलची किंमत सुमारे एक लाख रुपयाच्या जवळपास होती. यानंतर मोबाईल बाहेर काढण्यासठी पंपाच्या साहाय्याने पाणी उपसण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी हा फोन जलाशयातून बाहेर काढण्यात आला. अन्न निरीक्षकांचा फोन काढण्यासाठी जलाशयातील लाखो लीटर पाणी उपसण्यात आल्यानं ही बाब परिसरात चर्चेचा विषयी झाली.

पुण्याचा जागेवर राष्ट्रवादीने ‘अधिकृतपणे’ ठोकला दावा; अजित पवार म्हणाले, हो आम्ही इच्छूक!

सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते फिरायला

कोयलीबेडा ब्लॉकचे अन्न निरीक्षक राजेश विश्वास सोमवारी सुट्टीसाठी खेरकट्टा परळकोट जलाशयावर पोहोचले होते. त्यांचा महागडा फोन खेरकट्टा परळकोट जलाशयात पडला. तेव्हा जलाशय 15 फुटांपर्यंत पाण्याने काठोकाठ भरलेले होते. अधिकाऱ्याचा फोन जलाशयात पडल्यानंतर फोन शोधण्यासाठी सरकारी कर्मचारी पाणी काढण्यात व्यस्त झाले. फोन काढण्यासाठी, सलग तीन दिवस 30 एचपी पंप बसवून जलाशयातून पाणी उपसावे लागले. त्यानंतरच गुरुवारी सकाळी अन्न निरीक्षकाचा महागडा फोन बाहेर काढला.

अखेर निलंबन….
दरम्यान, फोन जलाशयातून बाहेर काढण्यासाठी लाखो लीटर पाणी उपलसे, याची सगळीकडे चर्चा झाली.
याबाबत भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर टीका केली. माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी ट्विटमध्ये लिहिले की, भूपेश बघेल यांच्या हुकूमशाहीत अधिकारी राज्याला वडिलोपार्जित जायजाद समजत आहेत. कडाक्याच्या उन्हात नागरिक टँकरवर अवलंबून आहेत, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. तर अधिकारी आपल्या मोबाईलसाठी 21 लाख लिटर पाणी वाया घालवत आहेत. यामध्ये दीड हजार एकर जमीन सिंचनाखाली येऊ शकते, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत कांकेर जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न निरीक्षकाला निलंबित केले आहे.

महागड्या छंदांमुळे चर्चेत
मोटार पंप लावून पाणी बाहेर काढणाऱ्या अन्न निरीक्षकाची पहिली पोस्टिंग 22 डिसेंबर 2018 रोजी झाली. अंतागड, भानुप्रतापपूर, कोयलीबेडा आणि पखंजूर येथे त्यांनी आपल्या सेवा दिली. ते नेहमीच वादात असतात. कोयलीबेडा येथे सेवेत असतांना त्यांना राशनाच्या तांदळात गडबड केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. आपल्या महागड्या छंदांमुळेही आणि जीवनशैली ते नेहमीच चर्चेत असतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube