कोलकात्यातील सरकारी इमारतीत भीषण आगीत ४ हजार EVM जळून खाक; घातपाताचा संशय, फॉरेन्सिक तपास सुरू

4 हजार ईव्हीएम मशिन्स जळून खाक झाल्याची माहिती राज्याचे अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा राज्यमंत्री कौशिक चौधरी यांनी दिली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 82

4,000 EVMs gutted in massive fire : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधील अलीपूर परिसरातील एका सरकारी इमारतीला लागलेल्या भीषण आगीमुळे सुमारे 4 हजार ईव्हीएम मशिन्स जळून खाक झाल्याची माहिती राज्याचे अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा राज्यमंत्री कौशिक चौधरी यांनी दिली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला असून, या आगीमागे घातपाताचा कोणता अँगल आहे का याचा देखील शोध घेतला जात आहे.

बुधवारी दक्षिण कोलकात्यातील नऊ माजली सरकारी इमारतीत भीषण आग लागली होती. या इमारतीत दक्षिण 24 परगणा जिलह परिषद कार्यालयासह विविध सरकारी विभागांची कार्यालये होती. घटनेनंतर घटनास्थळी भेट दिल्यानंतर मंत्री कौशिक चौधरी यांनी सांगितले की, या आगीत सुमारे 4 हजार ईव्हीएम मशीन नष्ट झाल्या असून त्या यंदाच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान राज्यातील दहा मतदारसंघांमध्ये वापरण्यात आल्या होत्या.

आगीचे स्वरूप संशयास्पद असल्याचे सांगताना चौधरी म्हणाले की, ही सामान्य आग वाटत नाही. घातपात झाला आहे का, याची चौकशी केली जात आहे. आग दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर प्रथम दिसून आली होती. मात्र चौथा, पाचवा आणि सहावा मजला तुलनेने कमी प्रभावित असताना आग थेट सातव्या, आठव्या तसेच वरच्या मजल्यांपर्यंत कशी पोहोचली, हा तपासाचा महत्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आग लागून जवळपास 24 तास उलटल्यानंतर देखील अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी कार्यरत होते. गुरुवारी सकाळी उघडपणे ज्वाळा दिसत नसल्या तरी इमारतीच्या आत काही ठिकाणी पॉकेट फक्त असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शीतकरण आणि आग पूर्णपणे विझवण्याचे काम सुरू असल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले.

बीडच्या खूप्रकरणात ट्वीस्ट; पतीला चिकन राईस आणायला पाठवलं अन् प्रियकराला सांगून…

या घटनेची चौकशी करण्यासाठी दक्षिण 24 परगणा प्रशासनाने अलीपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपासाला सुरूवात केली. प्राथमिक तपासात विद्युत बिघाड किंवा अन्य कोणते कारण आगीशी कारणीभूत ठरले का, याचा शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

तपासाच्या दृष्टीने संपूर्ण इमारत सील करण्यात आली असून प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आग विविध मजल्यांवर नेमकी कशी पसरली याचा तपास सुरू आहे. परिसरातील सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञ लवकरच घटनास्थळाची पाहणी करून नमुने गोळा करणार असून, त्यांच्या अहवालावरून ही आग अपघाती होती कि जाणूनबुजून लावण्यात आली होती, याबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.

या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार यांनी घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे, तर भाजप नेते राकेश सिंह यांनी ही आग नियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप केला आहे. मात्र या दाव्यांना अद्याप कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. तपास अधिकारी मात्र कोणताही निष्कर्ष फॉरेन्सिक तपास आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारेच काढला जाईल, असे सांगत आहेत. तसेच या आगीत सरकारी कागदपत्रे, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा यंत्रणांचे किती नुकसान झाले आहे, याचाही आढावा घेतला जात आहे.

follow us