1 मे पासून होणारे ‘हे’ 6 मोठे बदल ; सामान्य माणसावर काय होणार परिणाम ?
May 1 Rule Changes Update : दोन दिवसांनंतर मे महिन्याची सुरुवात होणार असून या महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून देशात अनेक बदल होणार आहे.
May 1 Rule Changes Update : दोन दिवसांनंतर मे महिन्याची सुरुवात होणार असून या महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून देशात अनेक बदल होणार आहे. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होताना दिसणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देशात बँक खाती, विमा योजना, क्रेडिट कार्ड्स, कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेवर आणि ऑनलाइन गेमिंगमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन नियमावली लागू होणार
समोर आलेल्या माहितीनुसार, देशात 1 मे पासून ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन नियम लागू होणार आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘ऑनलाइन गेमिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ ला स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ‘ऑनलाइन गेमिंग नियमन कायदा-2025’ अंतर्गत, गेमिंग कंपन्यांना आता मानकांच्या एका नवीन संचाचे पालन करणे अनिवार्य असेल.
PMJJBY आणि PMSBY चे हप्ते (Premiums) कट होणार
‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ (PMJJBY) आणि ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY) यांचे वार्षिक हप्ते (Premiums) मे महिन्यात बँक खात्यातून आपोआप वजा (Auto-debit) केले जाणार आहेत. बँक खात्यांमधून अनुक्रमे 436 आणि 20 इतकी रक्कम वजा केली जाऊ शकते. ज्या खातेदारांनी या योजनांचे सदस्यत्व घेतले आहे.
एलपीजी सिलिंडर्स महाग होणार?
एलपीजी गॅस सिलिंडर्सच्या किमतींचा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आढावा घेतला जातो. या पार्श्वभूमीवर, 1 मे रोजी घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किमतींमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवरील दबाव आणि पुरवठ्याशी संबंधित परिस्थितीमुळे, गॅसच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
SBI कार्ड ग्राहकांना धक्का
SBI कार्ड 1 मे पासून आपल्या ‘विलंब शुल्क’ (Late Payment Fees) दरांमध्ये सुधारणा करणार आहे. आता ग्राहकांना अगदी लहान थकीत रकमेवरही शुल्क भरावे लागू शकते. याव्यतिरिक्त, काही विशिष्ट कार्ड्सवरील वार्षिक शुल्क माफ करण्याच्या अटींमध्येही बदल करण्यात आले आहेत.
e-KYC अपडेट करणे अनिवार्य
बँक ग्राहकांसाठी त्यांचे e-KYC तपशील अद्ययावत करण्याची अंतिम मुदत 1 मे आहे. ज्या खात्यांची KYC माहिती अपूर्ण आहे, अशा खात्यांवरील व्यवहार स्थगित करण्यासारखी कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे, कोणत्याही गैरसोयीपासून वाचण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या बँकेची शाखा, नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲपद्वारे त्यांचे तपशील त्वरित अपडेट करावेत.
PF काढण्याबाबत चर्चांना उधाण
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) संदर्भात सध्या चर्चा सुरू आहेत. ज्यानुसार भविष्यात एटीएम (ATM) आणि UPI द्वारे PF ची रक्कम काढण्याची सुविधा सुरू केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे या संदर्भात सरकारकडून किंवा EPFO कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
शिंदेंसोबत आमदारकीसाठी जाणार नाही पण विधानपरिषद दिली तर…, बच्चू कडूंकडून भूमिका स्पष्ट
सामान्य माणसावर काय परिणाम होणार ?
मे महिन्यापासून लागू होणारे हे बदल पगारदार व्यक्ती, गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहकांच्या मासिक बजेटवर परिणाम करू शकतात. संभाव्य आर्थिक अडचणी टाळण्यासाठी अचूक बँकिंग नोंदी ठेवणे, वेळेवर कर नियोजन करणे आणि नवीन नियमांबाबत अपडेट राहणे हिताचे ठरेल.