सावधान! AI ने बनवला 69 हजारांचा ‘हुबेहूब’ चेक; डिजिटल स्कॅमच्या नव्या अध्यायाला सुरूवात?

AI आता इतकं प्रभावी झालं आहे की, खरं आणि खोट्या गोष्टींतील फरक नष्ट करू लागला आहे.

News Photo   2026 04 25T155047.822

एका व्यक्तीने ट्वीटरवर एक पोस्ट व्हायरल (Bank) करून खळबळ उडवली आहे. ChatGPT Image 2.0 चा वापर करून 69,000 रुपयांचं चेक बनवलं. हा चेक एखाद्या साधारण कागदासारखा नाही, तर UCO बँकेचा खरा वाटेल असा चेकचा कागद होता.

यामध्ये बँकेचं नाव,खाते क्रमांक, तसच खाली असणारी MICR पट्टीही इतकी खरी होती की, पहिल्या नजरेत हा चेक अनेकांना खराच वाटेल. हा फोटो जसा व्हायरल झाला,इंटरनेटवर खळबळ उडाली. लोकांनी भीती वाटली की, जर भविष्यात कोणी एखादा हुशार मुलगा अशाप्रकारचे पासपोर्ट, व्हिसा किंवा सरकारी कागद बनवत असेल, तर काय होणार? या चेकला बनवणाऱ्या शिरीश नावाच्या यूजरने म्हटलंय की,आम्ही तर पूर्णपणे फसलो आहोत.

750 CIBIL स्कोअर तरीही बँकेने कर्ज नाकारलं? RBI ने सांगितली रिजेक्ट होण्याची कारणं

AI आता इतकं प्रभावी झालं आहे की, खरं आणि खोट्या गोष्टींतील फरक नष्ट करू लागला आहे. ही पोस्ट व्हायरल होताच इंटरनेटवर अनेक यूजर्सने प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. कोणी याला फोटोशॉपचा नवा अवतार म्हणत आहे,तर कोणी म्हणतं की, खरी समस्या चेक बनवणं नाही, तर त्याला बँकेत जाऊन वठवणं आहे.

एका यूजरने मजेशीर कमेंट करत म्हटलंय की, AI एवढं परफेक्ट चेक बनवत आहे. इथे माझी बँक आजही माझ्या खऱ्या सह्या रिजेक्ट करतात. एआयची ताकद एवढी प्रभावी आहे, तेवढीच घातकही आहे. जरी बँकेत ते पकडलं गेलं..पण सामान्य माणसाला डिजिटल युगात अडकवणं आता आणखी सोपं झालं आहे.यामुळे तुमच्या बँकिंग डिटेल्स आणि चेक बुकबाबत नेहमी सतर्क राहा.

follow us