केजरीवाल यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या 1500 हून अधिक लोकांसह आपच्या 32 आमदार, 70 नगरसेवकांना अटक

केजरीवाल यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या 1500 हून अधिक लोकांसह आपच्या 32 आमदार, 70 नगरसेवकांना अटक

दिल्लीतील अबकारी मद्य घोटाळाप्रकरणाचा (excise liquor scam) तपास आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात सीबीआयने (CBI) आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यामुळं अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, आज (रविवारी) केजरीवाल हे चौकशीसाठी सीबीआय मुख्यालयात चौकशीसाठी पोहोचले. या प्रकरणी सीबीआयची मुख्यमंत्र्यांची तीन तासांहून अधिक वेळ चौकशी सुरू आहे. केजरीवाल यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणाऱ्या 32 आमदारांना आणि 70 नगरसेवकांना पोलिसांनी अटक केल्याचं सांगितलं जात आहे.

अबकारी मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासू आणि माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी सीबीआयने अटक केली. त्यानंतर त्यांना तिहार तुरूंगात पाठवले आहे. दरम्यान, या घोटाळ्याची सीबीआयबरोबरच ईडीकडून चौकशी केली जात आहे. केजरीवाल यांचे नाव देखील ईडीने दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये आहे. त्यामुळं आता दिल्लीतील या कथित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आपला मोर्चा केजरीवाल यांच्याकडे वळवला. सीबीआयने शुक्रवारी केजरीवाल यांना समन्स बजावून रविवारी चौकशीसासाठी सीबीआय कार्यालयात हजर राहण्यास सांगतिले होते. त्यानुसार आज केजरीवाल मद्य धोरण प्रकरण चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात दाखल झाले. केजरीवालांसोबत त्यांचे दिल्ली सरकारचे मंत्री, आपचे खासदार-आमदार आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत माह हे देखील सीबीआय कार्यालयात गेले आहेत. केजरीवाल हे सीबीआय कार्यालयात जात असतांना त्यांच्या समर्थक लोकांनी दिल्लीत अनेक ठिकाणी निदर्शने केली. त्यामुळं पोलिसांनी आपचे आमदार, नरेश बालियान, प्रवीण कुमार यांच्यासह अनेकांना अटक केल्याची माहिती कॅबिनेट मंत्री राय यांनी दिली.

पोलिसांनी 1500 हून अधिक लोकांना अटक केली – AAP
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री गोपाल राय यांनी दावा केला आहे की, सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावल्यामुळे दिल्लीतील लोकांमध्ये नाराजी आहे. दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या 32 आमदार आणि 70 नगरसेवक आणि 1500 इतर लोकांना अटक केली आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या पंजाबच्या 20 आमदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तत्पूर्वी, सीबीआय चौकशी आणि ताब्यात घेतल्याच्या प्रश्नावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी काहीही चुकीचे केले नाही. मग लपवायचे तरी काय… जे प्रश्न विचारले जातील त्यांची आम्ही उत्तर देऊ. भाजपचे लोक सीबीआयवर भाजपचे नियंत्रण असल्याचे सांगत आहेत. ते कोणालाही जेलमध्ये पाठवू शकतात. मग त्यांनी गुन्हा केला असो की, नसो. कालपासून भाजप नेते सांगताहेत की, केजरीवाल यांना अटक करणार आहे. कदाचित मला अटक करण्याचे निर्देशही देण्यात आले असतील, असं केजरीवाल म्हणाले

पोलिसांनी आप नेत्यांना ताब्यात घेऊन आंदोलन संपवले
दिल्ली पोलिसांनी आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा, राज्यसभा सदस्य संजय सिंह, परिवहन मंत्री कैलाश गेहलोत, मंत्री राजकुमार आनंद, मंत्री इम्रान हुसैन, शिक्षण मंत्री आतिशी, मंत्री सौरभ भारद्वाज आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप पाठक यांना ताब्यात घेतले आहे.

केजरीवाल झुकणार नाहीत – खासदार संजय सिंह
दरम्यान, पोलिसांनी आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार यांना अटक केली. मात्र, खा. संजय सिंह म्हणाले, भापज सरकार हे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम केलेल्या मॉडेलच्या विरोधात आहे. त्यामुळं आप सरकारला अडचणीत आणण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, केजरीवाल झुकून लढणार नाहीत.”

दरम्यान, आता केजरीवाल यांच्या चौकशीतून काय समोर येतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube