अदानी आणि मोदी हे एकच…राहुल गांधी यांचा मोदींवर हल्लाबोल

अदानी आणि मोदी हे एकच…राहुल गांधी यांचा मोदींवर हल्लाबोल

नवी दिल्ली : काँग्रेसच्या 85व्या अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उदयोजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच राहुल यांनी भाजप आणि आरएसएसवरही हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले की, अदानी प्रकरणाची चौकशी का होत नाही, जेपीसी का स्थापन केली जात नाही. अदानी आणि मोदी एक आहेत. देशाची संपूर्ण संपत्ती एका व्यक्तीच्या हातात जात आहे. अदानीचे सत्य समोर येईपर्यंत थांबणार नाही, असे म्हणतच राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर थेट हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) रायपूर पक्षाच्या (Congress) अधिवेशनातून बोलत होते. भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, आम्ही सत्याग्रही आहोत आणि भाजप-आरएसएसचे लोक ‘सत्ताग्रही’ आहेत. मी एका उद्योगपतीवर संसदेत हल्ला केल्याचे राहुल गांधी म्हणाले. मी फक्त एक प्रश्न विचारला, मोदीजी, तुमचा अदानीजींशी काय संबंध? संपूर्ण भाजप सरकार अदानीजींना संरक्षण देऊ लागले.

यावेळी अदानी आणि मोदी यांच्या मुद्द्यावरून राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, एलआयसीची गुंतवणूक अदानी समूहामध्ये असून त्यांचे नुकसान होत आहे. स्टेट बँक अदानीला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज देत आहे. त्या टेबलावर मोदी का बसले आहेत? त्याचा अदानीशी काय संबंध. अदानीशी आपले संबंध नाहीत असे मोदी म्हणाले. मात्र अदानी आणि मोदी एक आहेत.

देशाची संपूर्ण संपत्ती फक्त एकाच व्यक्तीच्या हातात जात आहे. संरक्षण, शेती. संरक्षण सर्व एकाच व्यक्तीच्या हातात जात आहे. राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा आपण फक्त विचारतो की नाते काय? आमचे संपूर्ण भाषण काढून टाकले जाते. अदानीचे सत्य समोर येईपर्यंत आम्ही प्रश्न विचारत राहू. अदानीच्या कंपनीत काम करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की ही कंपनी देशाचे नुकसान करत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा शिंदे गटात प्रवेश

राहुल म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्याची सुरुवातही एका कंपनीतून झाली. त्या कंपनीने भारतातील सर्व संपत्ती हिसकावून घेतली होती. इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. देशाच्या विरोधात काम केले जात आहे. देशाच्या विरोधात काम केले तर काँग्रेस पक्ष अशांच्या विरोधात उभा राहील.

बारामतीत येऊन अजित पवारांचे बारा वाजवून दाखवाच; राष्ट्रवादीने स्वीकारले राणेंचे चॅलेंज

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube