अजित पवारांचे बंड फसणार, रणनीतीकार प्रशांत किशोरांचा मोठा दावा

अजित पवारांचे बंड फसणार, रणनीतीकार प्रशांत किशोरांचा मोठा दावा

Prashant Kishor on Ajit Pawar : विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत अजित पवार यांन थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीतील बंडानंतर कोणत्या गटाकडे किती आमदार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उद्या मुंबईत अजित पवार आणि शरद पवार यांनी आमदारांची स्वतंत्र्य बैठक बोलवली आहे. मुंबईत मोठ्या घडामोडी घडत असताना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठे विधान केले आहे. एका गटातून दुसऱ्या गटात आमदार गेल्याने पक्षाच्या मतांमध्ये जास्त फरक पडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडखोरीबाबत प्रशांत किशोर म्हणाले की, काय योग्य आहे आणि काय नाही हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवायचे आहे, परंतु सर्वसाधारणपणे एका गटातून दुसऱ्या गटात आमदार गेल्याने पक्षाच्या मतांमध्ये फारसे काही होत नाही. तसेच महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाचा इतर कोणत्याही राज्यात परिणाम होणार नाही. बिहारमध्येही मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आरजेडीसोबत सरकार स्थापन केले, तेव्हा त्याचा परिणाम इतर कोणत्याही राज्यावर झाला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

पुण्यातील आमदार तुपे, टिंगरे नेमकी कुणाबरोबर ? दोघांची राष्ट्रवादीच्या बैठकीला मारली दांडी !

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात एकजूट करण्याचे विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी रणनीतीबाबत विरोधी पक्षांची बैठक बंगळुरू येथे होणार आहे. विरोधी पक्षांची एकजूट कशी यशस्वी होईल, हे यावेळी प्रशांत किशोर यांनी सांगितले.

NCP : अमोल कोल्हेंचे 24 तासांत घुमजाव; पवारांना भेटले पण राजीनामा न देताच माघारी फिरले

प्रशांत किशोर यांनी सांगितले की, विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी प्रयत्न केले जात आहेत पण केवळ अंकगणितावर विसंबून न राहता एक अजेंडा ठरवून एकत्र आले तर निवडणुकीत फायदा होईल. ते म्हणाले, विरोधक तेव्हाच एकजुटीने काम करू शकतात जेव्हा ते सत्ताधाऱ्यांविरोधात अजेंडा तयार करण्यात यशस्वी होतील. उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, लोकनायक जयप्रकाश नारायण यांनीही आंदोलन केले आणि नंतर आणीबाणी लागू झाली. अशाच बोफोर्स प्रकरणाने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube