अतिक-अश्ररफ हत्येचा बदला घेऊ ; ‘अल कायदा’ची भारताला धमकी
Al Qaeda Threatens India : उत्तर प्रदेशमधील गँगस्टर आणि माजी खासदार अतिक अहमद व त्याचा भाऊ अश्ररफ यांच्या हत्येच्या पडसाद देशात उमटत आहे. आता या हत्येची दखल दहशतवादी संघटना अल कायदाने घेतली आहे. या दोघांच्या हत्याकांडाचा बदला घेऊ, अशा धमकीचे पत्र अल कायदाने काढली आहे. यानंतर आता केंद्रीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
पटनातील जामा मशिदीबाहेर ‘अतिक अहमद अमर रहे’ च्या घोषणा
गॅंगस्टर अतिक अहमद, त्याचा भाऊ अश्ररफ यांची १५ एप्रिल रोजी प्रयागराज येथे हत्या झाली होती. पोलिसांच्या ताब्यात असताना ही हत्या झाली आहे. शूटर अरुण मौर्या, सनी आणि लवलेश तिवारी या तिघांनी हे हत्याकांड घडविले आहे. त्याचे राजकीय पडसाद देशात उमटत आहे. शुक्रवारी बिहारमधील पटणा येथे अतिक अहमदच्या समर्थनामध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे. तर काही राजकीय पक्षांनी अहमदच्या हत्येवरून राजकीय टीका-टिप्पणी सुरू केली आहे.
भर गर्दीत चार राऊंड फायर; साकेत कोर्टातील गोळीबाराचा लाईव्ह व्हिडीओ
त्यात आता अल कायदा संघटना उतरली आहे. या संघटनेने एक पत्रक काढून अतिक अहमद व त्याच्या भावाच्या हत्येचा बदला घेऊ, असे पत्रक काढले आहे. त्यामुळे केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या दोघांच्या हत्येमध्ये प्रयागराजसह यूपीतील काही शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे.