महिना 11 लाख रूपये सॅलरी तरीही पैसा पुरेना अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्याने सांगितलं खर्चाच गणित…

Amazon employee अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका अमेझॉन कर्मचाऱ्याने आपल्या कोट्यवधींच्या पगारासह प्रचंड खर्चांचाही खुलासा केला आहे.

Amazon Employee

Amazon employee says he still doesn’t have enough money despite earning Rs 11 lakh per month : अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका अमेझॉन कर्मचाऱ्याने आपल्या कोट्यवधींच्या पगारासह प्रचंड खर्चांचाही खुलासा केला आहे. ही रक्कम ऐकायला एखाद्या स्वप्नासारखी वाटू शकते, मात्र इतकी मोठी कमाई असूनही आपण आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटत नसल्याचे त्या कर्मचाऱ्याने सांगितले आहे.

AIDMK’ला दुसरा मोठा धक्का; तीन आमदारांचा राजीनामा, काय घडलं?

अमेरिकेतील सिएटलमध्ये राहणारे ईशान जैन हे अमेझॉनमध्ये सीनियर प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बिझनेस इनसाइडरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांचे वार्षिक पॅकेज सुमारे 2.85 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 2.8 कोटी रुपये आहे. कर आणि 401(k) योगदान वजा केल्यानंतर त्यांच्या हातात दरमहा सुमारे 12 हजार डॉलर, म्हणजेच जवळपास 11 लाख रुपये उरतात. मात्र वाढत्या खर्चांमुळे ही रक्कम प्रत्यक्षात तितकी मोठी वाटत नसल्याचे ईशान म्हणाले.

घराच्या EMI मध्येच निम्मा पगार खर्च

ईशान आपल्या पत्नी आणि मुलासोबत सिएटलमधील चार बेडरूमच्या घरात राहतात. त्यांच्या घरी लवकरच दुसऱ्या बाळाचे आगमन होणार आहे. त्यांनी सांगितले की, घराच्या मॉर्गेजची म्हणजेच EMI ची रक्कम दरमहा सुमारे 5 हजार डॉलर (जवळपास 4.7 लाख रुपये) आहे. यात कर आणि विम्याचाही समावेश आहे. एका व्यक्तीच्या कमाईवर संपूर्ण कुटुंबाचा खर्च भागवणे सोपे नसल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः हेल्थकेअर, मुलांची देखभाल आणि दैनंदिन खर्च सातत्याने वाढत असल्याने आर्थिक ताण जाणवत असल्याचे ते म्हणाले.

टेस्ला आणि रेंज रोव्हरमुळेही मोठा खर्च

ईशानकडे टेस्ला आणि रेंज रोव्हरसारख्या महागड्या गाड्या आहेत. टेस्लाच्या EMI साठी दरमहा सुमारे 630 डॉलर खर्च होतात, तर रेंज रोव्हरचे कर्ज पूर्ण फेडले गेले आहे. मात्र दोन्ही गाड्यांचे इंधन आणि विमा यासाठी मोठा खर्च करावा लागतो. घराचे युटिलिटी बिल दरमहा सुमारे 800 डॉलर येते. कुटुंबाच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी जवळपास 750 डॉलर खर्च होतात. किराणा खर्चही कमी नाही. Costco मधून दरमहा सुमारे 1500 डॉलरची खरेदी केली जाते, तर इतर ठिकाणच्या खरेदीसाठी आणखी 400 ते 500 डॉलर खर्च होतात.

भारतातही घेतल्या अनेक मालमत्ता

ईशान यांचे वयाच्या 50 व्या वर्षी निवृत्त होण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. त्यांनी भारतात 3 ते 4 मालमत्ता खरेदी केल्या आहेत, ज्यातून भविष्यात भाड्याचे उत्पन्न मिळावे हा त्यांचा उद्देश आहे. ते दरमहा सुमारे 2 हजार डॉलर 401(k) मध्ये आणि आणखी 2 हजार डॉलर रोख गुंतवणुकीत टाकतात. एकूणच ते वर्षाला जवळपास 50 हजार डॉलरची बचत करतात. त्यांच्या गुंतवणुकीत शेअर्ससोबत सोने आणि चांदीसारख्या भौतिक मालमत्तांचाही समावेश आहे.

इमर्जन्सी फंडही नाही

विशेष म्हणजे कोट्यवधींची कमाई करणाऱ्या ईशानकडे स्वतंत्र इमर्जन्सी फंड नाही. ते सांगतात की, बहुतांश बचत पुन्हा गुंतवणुकीत वळवली जाते. गरज पडल्यास ते क्रेडिट कार्ड किंवा मित्र-नातेवाईकांच्या मदतीवर अवलंबून राहतात. गेल्या वर्षी प्रवास आणि इतर खर्चांमुळे त्यांच्यावर जवळपास 20 हजार डॉलरचे वैयक्तिक कर्जही झाले आहे.

मग ‘आर्थिक सुरक्षितता’ का वाटत नाही?

ईशान यांच्या मते, बाहेरून पाहता सहा आकडी पगार खूप मोठा वाटतो. पण अमेरिकेसारख्या देशात कुटुंबासोबत राहणे अत्यंत महागडे आहे. घर, आरोग्य सेवा, मुलांचे संगोपन आणि भविष्यासाठीच्या योजना यामध्ये खर्च इतक्या वेगाने वाढतात की आर्थिक सुरक्षिततेची भावना निर्माण होत नाही. आता ते आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र एज्युकेशन फंड सुरू करण्याच्या तयारीत असून, त्यात दरमहा किमान 500 डॉलर जमा करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

follow us