Amritpal Singh Operation : २० दिवसांपूर्वी ठरला होता ‘ॲक्शन प्लॅन’… अमित शहांना दिली होती धमकी!

Amritpal Singh Operation : २० दिवसांपूर्वी ठरला होता ‘ॲक्शन प्लॅन’… अमित शहांना दिली होती धमकी!

चंदीगड : खलिस्तान समर्थक वारिस पंजाब दे संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंगला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांनी ‘ऑपरेशन अमृतपाल’ तयार केले होते. त्यासाठी २० दिवसांपूर्वी ‘ॲक्शन प्लॅन’ ठरवण्यात आला. त्यासाठी पंजाब पोलिसांमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी सलग आठ बैठका घेतल्या. तर सलग १२ दिवस यावर काम केल्यानंतर शनिवारी (दि. १८) प्रत्यक्ष ‘ऑपरेशन’ राबवित अमृतपाल सिंग याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

वारिस पंजाब दे संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंग आणि त्याच्या समर्थकांनी अमृतसरच्या अजनाला पोलीस ठाण्यावर २३ फेब्रुवारीला हल्ला केला होता. त्यावेळी पंजाब पोलिसांवर सर्वस्तरातून टीका करण्यात आली. तेव्हाच पंजाब सरकारने अमृतपाल सिंग याच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय घेतला आणि तो तडीस नेला.

पंजाब पोलिसांनी २० दिवसांपूर्वी अमृतपालवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आधी अमृतपालच्या सर्व समर्थकांची ओळख पाठवण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष ऑपरेशन करत ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला. मात्र, यामध्ये पंजाब पोलिसांसमोर अमृतपाल याच्या सशस्त्र समर्थकांचे मोठे आव्हान होते. त्यासाठी पोलिसांनी एक टीम तयार करत त्याच्या समर्थकांचा शोध घेतला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वारिस दे पंजाब संघटनेच्या अमृतपाल सिंग याने धमकी दिली होती. इंदिरा गांधी यांनी पंजाबमधील शिख समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांचे काय झाले? याची माहिती अमित शहा यांनी घ्यावी. तुम्ही जर शिखांना दाबण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाही परिणाम भोगावे लागतील, अशी दमकी दिली होती.

पंजाब पोलिसांनी प्लॅन तयार करत या ऑपरेशन दरम्यान जर काही हिंसाचार घडला तर तो रोखण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत मदत मागितली. अमित शहा यांनी त्यानंतर केंद्रीय सुरक्षा दल पंजाब राज्यात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे केंद्रीय सुरक्षा दलाच्या १० तुकड्या पंजाबकडे रवाना झाल्या.

पंजाब पोलिसांनी ऑपरेशन अमृतपाल सिंग राबवण्यासाठी जाणीवपूर्वक शनिवार (दि.१८) हा दिवस निवडला होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे अमृतपालच्या खालसा वाहिरला मुक्तसर येथे रोखले होते. तो रविवारपासून (दि. १९) हा वाहिर पुन्हा सुरू करणार होता. पोलिसांनी त्यापूर्वीच जर कारवाई केली नसती तर त्याठिकाणी अमृतपालचे मोठ्या प्रमाणात समर्थक गोळा असते. त्यामुळे तेथील परिस्थिती खूपच चिघळली असती. परिणामी १९ मार्चपूर्वी कारवाई करणे गरजेचे होते. त्यामुळे प्लॅननुसार शनिवारच्या दिवशीच कारवाई करण्यात आली.

Dilip Walse Patil : आमदारांच्या हालचाली जाणवतात… लवकरच सरकार कोसळणार ?

पंजाब पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑपरेशन अमृतपाल सिंग पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुख्य सचिवांसह गृह सचिव, कायदा व सुव्यवस्था, गुप्तचर विभाग प्रमुख, काउंटर इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांची संयुक्त पणे बैठक घेण्यात आली. त्यामुळे २० दिवसांत ८ बैठका घेत संपूर्ण प्लॅन तयार केला.

अमृतपाल आणि त्याच्या समर्थकांना पकडताना काही हिंसाचार झाला तर या हिंसाचाराचा सामना करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या, वॉटर कॅनन, दंगल विरोधी दल व पंजाब सशस्त्र पोलीस सज्ज केले. त्यांना सतत दक्ष ठेवले. पहिल्याच दिवशी अमृतपाल सिंगच्या सर्वच सशस्त्र समर्थकांना पंजाब पोलिसांनी अटक केली. जालंधरचे पोलिस आयुक्त कुलदीप चहल यांनी अमृतपाल सिंगची दोन्ही वाहने, त्यांच्यासोबत असलेल्या सर्व शस्त्रधारी व्यक्तींना पकडल्याचे जाहीर केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube