Amritpal Singh Arrest Operation: अमृतपाल सिंगचे काका आणि ड्रायव्हरचे आत्मसमर्पण, स्वतः पोहोचले पोलिसांकडे

  • Written By: Published:
Amritpal Singh Arrest Operation: अमृतपाल सिंगचे काका आणि ड्रायव्हरचे आत्मसमर्पण, स्वतः पोहोचले पोलिसांकडे

Amritpal Singh Arrest Operation: खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला शोधण्यासाठी पंजाब पोलिसांची शोधमोहीम वेगाने सुरू आहे. दरम्यान, अमृतपालचे काका हरजीत सिंग आणि ड्रायव्हर हरप्रीत सिंग यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचा दावा केला जात आहे.

खरं तर, शनिवारी (18 मार्च) पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्यांच्या अनेक समर्थकांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. शनिवारी मध्यरात्री अमृतपालचे काका आणि त्याच्या ड्रायव्हरने स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाल्याचं वृत्त आहे. दोघेही अमृतपालच्या मर्सिडीज कारमध्ये आले होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अमृतपाल शरण येऊ शकतो

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृतपाल, ड्रायव्हर आणि काका तिघेही शनिवारी एकाच मर्सिडीज कारमधून पळून गेले. अमृतपालही लवकरच पोलिसांसमोर हजर होऊ शकतो, असे मानले जात आहे. अमृतपालच्या आत्मसमर्पणासाठी डीआयजी दर्जाचा अधिकारी त्याचा काका हरजित सिंग यांच्याशी बोलणी करत आहे. त्याचवेळी हरजीत सिंगकडून 32 बोअरचे पिस्तूल आणि एक लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

कोरफड लावल्यानंतरही योग्य चमक येत नाही… जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत 

पंजाबमध्ये हाय अलर्ट

18 मार्चपासून सुरू झालेली पंजाब पोलिसांची कारवाई 19 मार्चलाही सुरू होती. त्याचबरोबर पोलिसांनी आतापर्यंत 112 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी 7 अवैध शस्त्रे, 300 हून अधिक गोळ्या, 3 वाहने जप्त केली आहेत. यासोबतच काही फोनही जप्त करण्यात आले असून ते तांत्रिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचे पाकिस्तान-आयएसआयशी असलेले संबंधही समोर आले आहेत. पंजाबमध्येही हाय अलर्ट जारी आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी अमृतपाल सिंगचा फायनान्सर दलजीत सिंग कलसी याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलसीच्या फोनमध्ये आणि त्याच्याशी संबंधित असलेले पाकिस्तानी नंबर सापडले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube