ब्रिगेडियरचा गणवेश, बनावट ओळखपत्र आणि खोटी सुरक्षा व्यवस्था; तरुणाचा धक्कादायक बनाव उघड

सैनिकी रुबाबात वावरणाऱ्या २१ वर्षीय आर्यन वर्मा या तरुणाला अखेर लष्कराच्या जवानांनी सापाला रचून अटक केली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 89

Army arrests fake Brigadier : भारतीय लष्करातील ब्रिगेडियर असल्याची खोटी ओळख सांगत सैनिकी रुबाबात वावरणाऱ्या २१ वर्षीय आर्यन वर्मा या तरुणाला अखेर लष्कराच्या जवानांनी सापाला रचून अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील शाहजहापूर छावणी परिसरात ही कारवाई करण्यात आली. आर्यन वर्मा हा गेल्या अनेक महिन्यांपासून स्वतःला भरतोय लष्करातील वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवत होता. तो अनेकदा ब्रिगेडियरचा गणवेश घालून लष्करी परिसरात फिरत असे. त्याच्या सोबत कायम एक पथक देखील असायचं, त्यामुळे तो अनेकांना खरोखरच लष्करातील अधिकारी असल्याचा भास होत होता.

लष्कराचे अधिकारी एप्रिल महिन्यापासून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. मात्र, प्रत्येक वेळी तो अधिकाऱ्यांना चकवा देण्यात यशस्वी ठरत होता. अखेर त्याला पकडण्यासाठी लष्कराने विशेष योजना आखली. जवानांनी सामान्य नागरिक असल्याचं भासवत त्याच्याशी संपर्क साधला आणि लष्कर भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन तसेच प्रेरणादायी भाषण करण्यासाठी त्याला आमंत्रित केलं. शाहजहापूर कॅंटोन्मेंट परिसरातील शहीद म्यूजियममध्ये हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचा घात होऊ शकतो; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

आर्यन वर्माने हे आमंत्रण स्वीकारलं आणि शुक्रवारी सकाळी ती ब्रिगेडियरचा गणवेश परिधान करून कार्यक्रमस्थळी पोहोचला. तो टाटा हॅरियर कारमधून आला होता. विशेष म्हणजे, त्या वाहनावर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडे असणारे मिलिटरी स्टार आणि ध्वज लावण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी पोहोचताच आधीपासून सज्ज असलेल्या जवानांनी त्याला ताब्यात घेतलं. तपासादरम्यान त्याच्या चालकाकडून बनावट सरकारी ओळखपत्र जप्त करण्यात आलं.

आर्यन वर्मासोबत दोन बाउन्सर देखील होते. त्यांची ओळख तो नॅशनल सिक्युरिटी गार्ड अर्थात एनएसजी कमांडो अशी करून देत असे. स्वतःला विशेष सुरक्षा मिळाल्याचं भासवत तो लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्याप्रमाणे रुबाबात वावरत होता. त्याच्याकडून लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांचा शिक्का असलेलं संशयास्पद ओळखपत्र, रेजिमेंटल स्टिक आणि एक बनावट बंदूकही जप्त करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता बरेलीच्या लष्करी तपास पथकाकडे सोपवण्यात आला असून, आर्यन वर्मा नेमका किती काळापासून ही फसवणूक करत होता, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.

follow us