Big Breaking! पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक टळली…
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इम्रान खान यांनी पोलिसांसमवेत स्टॅंड-ऑफ केल्यानंतर न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सध्या तरी इम्रान खान यांची अटक टळली असून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत अटक होणार नसल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे.
तोशकाना प्रकरणी पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटक करण्यासाठी लाहोर पोलिसांचा मोठा फौजफाटा जमान पार्कमध्ये पोहचला होता. यावेळी इम्रान खान समर्थक आणि पोलिसांमध्ये् धुमश्चक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
आयपीएलच्या आधी चेन्नईचा कर्णधार माहिचा ‘रॉकस्टार’ लूक व्हायरल, पाहा VIDEO
पंतप्रधानपदावर असताना इम्रान खान यांनी विदेशी राजकीय नेत्यांकडून मिळालेल्या सरकारी भेटी वैयक्तिक स्वार्थासाठी विकल्याचा आरोप ठेवण्यात आल्याने न्यायालयाने खान यांच्या अटकेचा आदेश दिला.
त्यानंतर इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिसांचा मोठा ताफा लाहोरमधील जमान पार्कमध्ये पोहोचला. मात्र, अटक करण्यासाठी गेलेले पोलिस आणि समर्थकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली आहे. तसेच दगडफेकही झाल्याची माहिती समोर आली.
Devendra Fadnvis : शेतकऱ्यांना रुपयांत पीकविमा दिला तर पोटात का दुखतंय?
खान यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना मोठ्या धर्मसंकटाला सामोरे जावं लागलं. या पोलिसांना इम्रान समर्थकांशी नडावं लागलं. अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर इम्रान खान समर्थकांनी प्रचंड दगडफेक करत जाळपोळ केली. त्यामुळे अनेक पोलीस जखमी झाले.
दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इम्रान खान समर्थक आणि पोलिसांत मोठा हिंसाचार घडत असल्याने पोलिसांकडून समर्थकांना शेवटचा अलर्ट देण्यात आला होती. मात्र, समर्थकांकडून पोलिसांच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेतल्याचं दिसून आलं नसल्याचंही समोर आलं.
दरम्यान, तुर्तास पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दिलासा मिळाला असून त्यांना उद्या सकाळी वाजेपर्यंत अटक होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकरणावर खान म्हणाले, पोलीस मला तुरुंगात टाकण्यासाठी आली आहे. त्यांना असं वाटतं की इम्रान खानला तुरुंगात टाकलं तर समुदाय झोपी जाईल.
तुम्ही या लोकांना चुकीचं ठरवा, तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की तुम्ही एक जिवंत समुदाय आहात. तुम्ही मोहम्मद मुस्तफा यांचे अनुयायी आहात आणि आपला समुदाय इलाहा इलल्लाह या नाऱ्यावर बनलेला असल्याचं ते म्हणाले आहेत.