असद अहमदला पोलिसांनी कसं घेरलं?; 10 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या Encounter ची इनसाईड स्टोरी

असद अहमदला पोलिसांनी कसं घेरलं?; 10 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या Encounter ची इनसाईड स्टोरी

Asad Ahmed Encounter :  उत्तर प्रदेशमधील माफिया डॉन अतीक अहमदचा मुलगा असद अहमदचा आज ( 13 एप्रिल 2023 ) रोजी एनकाउंटर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या झाँसी येथे हा एनकाउंटकर करण्यात आला आहे. उमेस पाल हत्याकांडानंतर पोलिस त्यांच्या शोध घेत होती. आता पोलिसांना त्याचा एनकाउंटकर केला आहे. पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते.

1. शूटर गुलामचा युपीच्या एसटीएफने झाँसीमध्ये एनकाउंटर केला आहे. यावेली असद व गुलाम या दोघांजवळ नवीन सिम कार्ड व नवीन फोन होते. त्यांच्याकडे परेदशी हत्यार देखील मिळाले आहेत.

2. मिळालेल्या माहितीनुसार, असद व गुलामने केलेल्या फायरिंगनंतर पोलिसांनी त्यांच्यावर फायरिंग केली. यावेळी दोघेही मारले गेले.

पाटणा विमानतळावर बॉम्बची धमकी… एकाला उचलले!

3. असद हा पोलिसांपासून वाचण्यासाठी प्रयागराज, दिल्ली, अजमेर अशा अनेक ठिकाणी लपण्याचा प्रयत्न करत होता. उमेश पालच्या हत्येनंतर असद हा प्रयागराजमधून कानपूर येथे गेला होता. इथून तो बसमधून दिल्लीला गेला व तिथून अजमेर येथे आला होता.

4. असद फरार असताना तो अतीक अहमदच्या कॉन्ट्रॅक्टचा वापर करत होता. यावेळी असद हा अतिक अहमदच्या देखील संपर्कात होता.

5. उमेश पाल हा माजी बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्याकांडातील साक्षीदार होता. प्रयागराजच्या धूमनगंज भागामध्ये 24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल व त्याचे 2 सुरक्षारक्षक संदीप निषाद व राघेवंद्र यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

पत्नी, बहीण अन् भाची सर्वांवर गुन्हे; अतिकच्या गुन्हेगारी टोळीत कोण-कोण ?

6. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने असदला मदत करणाऱ्या तीन आरोपींना युपी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. असद व गुलामला दोन हत्यार तस्करांनी दिल्लीमध्ये शरण दिली होती.

7. मागच्याय महिन्यामध्ये असद लपण्यसाठी दिल्ली येथे आला होता. इथे त्याला त्याच्या जुन्या ड्रायव्हरने लपण्यासाठी मदत केली होती.

8. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तो दक्षिण व पश्चिम दिल्लीच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी 15 दिवस लपून राहिला होता.

9. युपी एसटीएपफच्या सूचनेनंतर दिल्ली पोलिसांनी असदला मदत करणाऱ्या तीन आरोपींना त्यांच्याकडे सोपवले होते.

पाटणा विमानतळावर बॉम्बची धमकी… एकाला उचलले!

10. यावेळी दोघांजवळ नवीन सिम कार्ड व नवीन मोबाईल फोन होते. त्यांच्या जवळ परदेशी हत्यार देखील आढळून आले आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube