पत्नी, बहीण अन् भाची सर्वांवर गुन्हे; अतिकच्या गुन्हेगारी टोळीत कोण-कोण ?

पत्नी, बहीण अन् भाची सर्वांवर गुन्हे; अतिकच्या गुन्हेगारी टोळीत कोण-कोण ?

Asad Ahemad : उत्तर प्रदेशातील उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी अतिक अहमद याचा मुलगा असद अहमदचा (Asad Ahemad) युपी पोलिसांना एनकाउंटर केला. या हत्याकांडानंतर असद फरार होता. या हत्याकांडानंतर अतीक अहमद आणि त्याचे कुटुंब  सातत्याने चर्चेत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी अतीकचा भाऊ अशरफ याच्या पत्नीलाही आरोपी बनवले आहे. अशरफची पत्नी जैनब फातिमाची सुद्धा मिलीभगत होती असे पोलिसांचे म्हणणे आहे.

अतीकची बहिण आयशा नुरी आणि भाची उनजिला नुरी यांच्यावरही उमेश पाल हत्याकांडातील दोषींना आश्रय दिला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतीकच्या परिवारातील 9 सदस्य कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. यातील एक असद हा पोलीस एनकाउंटरमध्ये मारला गेला आहे.

पाटणा विमानतळावर बॉम्बची धमकी… एकाला उचलले!

अतीक अहमद

फुलपूर मतदारसंघातून खासदार राहिलेला गँगस्टर अतीक अहमद याच्यावर 102 केस दाखल आहेत. उमेश पाल अपहरण प्रकरणा एका न्यायालयाने त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. अतीकवर तीन वेळा गँगस्टर कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र, सरकारच्या वरदहस्तामुळे तो हटविण्यात आला. अतीकला उत्तर प्रदेशातील बऱ्याचशा जेलमध्ये ठेवले होते. मात्र तेथेही अतीक अहमद त्याचा दरबार भरवतच होता.

त्यानंतर त्याला गुजरातच्या साबरमती जेलमध्ये धाडण्यात आले होते. अतीक अहमद सर्वात आधी 1979 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. युपी पोलिसांच्या मते अतीकशी संबंधित 54 खटल्यांची सुनावणी उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठाण्यात सुरू आहे.

अतीकवर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि धमकी देणे यांसारख्या गंभीर आरोपांतर्गत खटले दाखल आहेत. अतीकवर युपी पोलिसांव्यतिरिक्त प्रवर्तन निदेशालयाकडून चौकशी सुरू आहे.

खालिद अजिम उर्फ अशरफ

अतीकनंतर त्याच्या कुटुंबात सर्वाधिक खटले त्याचा छोटा भाऊ खालिद अजिम उर्फ अशरफ याच्यावर दाखल आहेत. अशरफला उमेश पाल हत्याकांडात कट रचण्याच्या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले आहे.

अशरफ सध्या बरेलीच्या जेलमध्ये बंद आहे. अशरफवर 52 अपराधिक खटले दाखल आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेचा सदस्य राहिलेला अशरफ राजू पाल हत्याकांडातील आरोपी आहे. अशरफवर पहिला खटला 1992 मध्ये दाखल करण्यात आला होता.

मोहम्मद अली

अतीकच्या दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा मोहम्मद अली याच्यावर 6 क्रिमिनल केस दाखल आहेत. अलीवर युपी पोलिसांनी 50 हजार रुपयांचे बक्षीसही ठेवले होते. जुलै 2022 मध्ये मात्र त्याने शरणागती पत्करली होती. त्यानंतर तो जेलमध्ये बंद आहे. अलीवर नातेवाईक जीशानकडून पाच कोटी रुपये मागणे, मारपीट करण्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

पाटणा विमानतळावर बॉम्बची धमकी… एकाला उचलले!

मोहम्मद उमर

अतीकचा सर्वात मोठा मुलगा उमर याच्यावर आधीच दोन गुन्हे दाखल आहेत. यामध्ये व्यावसायिक मोहित जायसवाल अपहरणाचा समावेश आहे. या प्रकरणातच सीबीआयचे पथक चौकशी करत आहे. या प्रकरणात आरोप निश्चितीही झाली आहे. उमर सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे. दोन लाख रुपये बक्षीसाच्या घोषणेनंतर तो ऑगस्ट 2022 मध्ये पोलिसांना शरण आला होता.

शाइस्ता परवीन

अतीक अहमदची पत्नी शाइस्ता हीला पोलिसांनी उमेश पाल हत्याकांडात पोलिसांनी आरोपी केले आहे. शाइस्तावर चार गुन्हे दाखल आहेत. शाइस्तावर आरोप आहे की ती उमेश पालच्या हत्येआधी शुटर्सला भेटली होती. शाइस्ता सध्या फरार आहे. अतीक आणि शाइस्ता यांचे लग्न 1996 मध्ये झाले होते. अतीक आणि शाइस्ता यांना पाच मुले आहेत.

असद अहमद

असदा हा अतीक अहमदचा तिसरा मुलगा होता. त्याला युपी पोलिसांनी झांसीच्या जवळ मारले आहे. असद हा सुद्धा उमेश पाल हत्याप्रकरणात आरोपी होता आणि एक महिन्यापासून फरार होता. पोलिसांचे म्हणणे आहे की हत्येच्या वेळी असद हा मारेकऱ्यांबरोबर होता. हत्येचा कट जेलमध्ये रचण्यात आला. ज्यात असदचाही सहभाग होता. असदने बारावी पास केली होती आणि पुढील शिक्षणासाठी तो विदेशात जाण्याचे ठरवत होता.

पाटणा विमानतळावर बॉम्बची धमकी… एकाला उचलले!

आयशा नुरी

अशरफची बहिण आयशा नुरी मेरठमध्ये आपल्या कुटुंबासह राहते. आयशावर नुकताच खटला दाखल करण्यात आला आहे. आयशा आणि उनजिला यांच्यावर मारेकऱ्यांना आश्रय देण्याचा आरोप आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर नुसार आरोपींनी त्यांनी आश्रय दिला होता. तसेच या दोन आरोपींना पळून जाण्यातही मदत केली.

जैनब फातिमा

अशरफची पत्नी जैनबला उमेश पाल हत्याकांडात आरोपी करण्यात आले आहे. जैनबवर कट रचणे आणि तथ्य लपविण्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणात जैनब उच्च न्यायालयात गेली होती. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. आता तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube