जर मोदींनी ‘हे’ मान्य केलं तर आम्ही हजर राहू; संसद भवनाच्या वादावर ओवैसींचा प्रस्ताव

जर मोदींनी ‘हे’ मान्य केलं तर आम्ही हजर राहू; संसद भवनाच्या वादावर ओवैसींचा प्रस्ताव

Asaduddin Owaisi on New Parliament Building : देशाला नवीन संसद भवन मिळणार आहे. येत्या 28 तारखेला पंतप्रधान मोदी संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन करण्यावरुनच सगळा वाद पेटला आहे. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांनी करावे, अशी मागणी करत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. आता एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे.

ओवैसी म्हणाले, पीएम मोदी (PM Narendra Modi) यांनी संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन करू नये. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांना उद्घाटन करू द्यावे. जर पंतप्रधानांनी हे मान्य केले तर त्यांचा पक्ष या कार्यक्रमात सहभागी होईल. जर असे घडले नाही तर त्यांचा पक्षही सहभागी होणार नाही. जर पंतप्रधानांनी उद्घाटन केले तर एक चुकीची परंपरा सुरू होईल.

नवीन संसद भवनाची गरज आहेच त्याचा कुणीही अस्वीकार करणार नाही. मात्र याचे उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी करू नये. कारण असे करणे शक्तीच्या पृथक्करणाच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. ओवैसी पुढे म्हणाले, विरोधी पक्षांनी आम्हाला संपर्क केलेला नाही. उद्घाटन लोकसभा स्पीकर यांनी करावे कारण ते संसदेचे अभिरक्षक आहेत.

काँग्रेससह 19 राजकीय पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, की आम्ही सगळ्यांनाच उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. पण जो तो ज्याच्या त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेनुसार प्रतिक्रिया देत आहगे आणि कामही करत आहे.

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी म्हणाले, की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये संसदेच्या एका बिल्डिंगचे उद्घाटन केले होते. राजीव गांधी यांनीही पंतप्रधान असताना संसदेच्या ग्रंथालयाची पायाभरणी केली होती. जर काँग्रेस नेते पंतप्रधान पदावर असताना अशी उद्घाटने करू शकतात तर सध्याचे प्रधानमंत्री का करू शकत नाहीत. यावर काँग्रेस नेते मनिष तिवारी म्हणाले, हरदीप पुरी संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करत आहेत. संसदेचे ग्रंथालय आणि संसद भवन यात फरक आहे.

संसद भवनाचा वाद पेटला! राष्ट्रपतींचे नाव घेत विरोधकांचा कार्यक्रमावरच बहिष्कार

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube