Asian Games : भारतीय नारी सब पे भारी! नेमबाजीत ‘नीरु’ची ‘सुवर्ण’ कामगिरी; अंतिम फेरीत वर्चस्व…
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी प्रकारात भारतीय नारी नीरु धांडूने सुवर्ण कामगिरी करत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावलंय.
भारताच्या नीरू धांडा हिने महिलांच्या ट्रॅप शूटिंग प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक आहे. यासह भारताने आपले पाचवे सुवर्णपदक निश्चित केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. ही एक अशी अभूतपूर्व कामगिरी आहे जी कायमची इतिहासाच्या पानांवर कोरली जाईल.
GOLD FOR NEERU! 🥇🇮🇳🔥
Neeru wins Women’s Trap Individual Gold.
India’s 5th GOLD overall & 2nd GOLD in shooting!
#AsianGames2026 https://t.co/ylnEatCWcs
— ;-) (@timeout_7) September 29, 2026
नीरू धांडा या एक भारतीय ‘ट्रॅप शूटर’ असून, त्या देशातील ‘शॉटगन शूटिंग’मधील आघाडीच्या खेळाडूंपैकी एक म्हणून नावारूपाला आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय नेमबाजीतील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक असलेल्या इटलीमधील लोनाटो येथील ‘आयएसएसएफ (ISSF) शॉटगन वर्ल्ड कप’मध्ये, महिलांच्या ‘ट्रॅप’ प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरून या २६ वर्षीय खेळाडूने इतिहास घडवला.
नीरूने पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले आणि त्यानंतर अंतिम फेरीत संयम राखत फ्रान्सची माजी विश्वविजेती व ऑलिंपियन कॅरोल कॉर्मेनियर हिचा पराभव केला. विश्वचषकातील यशाव्यतिरिक्त, नीरू प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताच्या नेमबाजी संघाची एक महत्त्वाची सदस्यही राहिली आहे. २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत, तिने महिलांच्या ‘ट्रॅप टीम’ प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून देण्यात मदत केली आणि ११८ गुणांसह आशियाई क्रीडा स्पर्धेतील पात्रता फेरीचा विक्रम बरोबरीने नोंदवत वैयक्तिक अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली.