अतिक – अशरफवर हल्लेखोरांनी तुर्की बनावटीच्या पिस्तुलाने झाडल्या गोळ्या, तिघांविरूध्द FIR दाखल

अतिक – अशरफवर हल्लेखोरांनी तुर्की बनावटीच्या पिस्तुलाने झाडल्या गोळ्या, तिघांविरूध्द FIR दाखल

Assailants shot at Atiq with Turkey-made pistol as used by Moosewala killers, FIR registered : काल (शनिवारी) प्रयागराजमध्ये उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची खुलेआमपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत असतांनाच त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं ही घटना सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकून त्यांच्याविरुध्द एफआयआर नोंदवला आहे.

अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची काल पोलिसांच्या सुरक्षेत असतांना हत्या करण्यात आली. या दोघांना वैद्यकीय चाचणीसाठी नेले होते. त्यांना व्हॅनमधून उतरवण्यात आले त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य या तीन हल्लेखोरांनात ताब्यात घेतले. पोलिसांनीा त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्यासाठी शिक्षा) आणि 307 (हत्येचा प्रयत्न) तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3, 7, 25 आणि 27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना कोणत्याही स्वरुपाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं पोलिस तपासात समोरआलं आहे. सुरुवातीच्या चौकशीत आरोपींनी सांगितले की, त्यांना मोठा माफिया व्हायचं होतं, त्यामुळं त्यांनी या गॅंगस्टरच्या हत्या केल्या आहेत.

Nana Patole : पुलवामामध्ये सैनिकांच्या ताफ्यावर झालेल्या हल्यातील आरडीएक्स हे नागपुरमधून गेले

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन हल्लेखोर हे वेगवेगळ्या ठिकाणचे रहिवाशी आहेत. ललवेश तिवाही हा बांदाचा, अरुण मौर्य हा हमीमपूरचा तर सनी कासगंज हा जनपद येथील रहिवाशी आहे. हे हल्लेखोर अतिशय अत्याधुनिक शस्त्रे घेऊन आले होते आणि त्यांनी हातकड्या घातलेल्या गुंड भावांवर सुमारे 44 गोळ्या झाडल्या होत्या. त्यांनी झिगाना पिस्तूल वापरले. ही पिस्तुल तुक्रीमेड होती. पोलिसांनी आरोपींकडून बंदुकीची काडतुसं, एक कॅमेरा, एक माईक, जप्त केला आहे.

अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोन गुंड भावांची हत्या लाईव्ह कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्लेखोर मीडिया कर्मचार्‍यांच्या वेषात मायक्रोफोनसह जुना व्हिडिओ कॅमेरा घेऊन आले होते आणि अतिक आणि अशरफ यांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेत पोलिस वर्तुळात घुसले होते.

अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ हॉस्पिटलसमोर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असताना पहिली गोळी झाडण्यात आली. त्यानंतर दोन भावांवर गोळीबार झाला आणि अवघ्या 44 सेकंदात ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. मात्र, खाली पडल्यानंतरही हल्लेखोरांनी अतिक आणि अश्रफ यांच्यावर गोळीबार सुरूच ठेवला. हल्लेखोर अतिक आणि अश्रफ यांच्यावर त्यांची शस्त्रे रिकामे करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर जबरदस्त हल्ला केला. या झटापटीत पोलीस एस्कॉर्टचा भाग असलेले कॉन्स्टेबल मानसिंग यांच्या हाताला बंदुकीची गोळी लागली आणि एका पत्रकारालाही काही जखमा झाल्या.

अतिकवर 102 हून अधिक गुन्हेगारी खटले असून त्याचा भाऊ अश्रफ याच्यावर खून, जमीन हडप, अपहरण, खंडणीसह विविध गुन्ह्यांचे 57 गुन्हे दाखल आहेत. उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिकला 28 मार्च रोजी सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, तर त्याच्या भावाला खासदार/आमदार न्यायालयाने पुराव्यासाठी निर्दोष मुक्त केले होते.

दरम्यान, या दुहेरी हत्याकांडाने सध्या संपूर्ण उत्तरप्रदेशात कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube