अतीक अहमदला लागल्या ‘एवढ्या’ गोळ्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आले समोर

  • Written By: Published:
अतीक अहमदला लागल्या ‘एवढ्या’ गोळ्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आले समोर

Atiq Ahmed Suffered ‘So Many’ Bullets, Postmortem Report : अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना 16 एप्रिल रोजी प्रयागराजमधील कासारी-मासारी स्मशानभूमीत दफन करण्यात आले. 15 एप्रिलच्या रात्री प्रयागराजमध्ये अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली होती. मीडिया कर्मचारी म्हणून गेलेल्या तिघांनी पोलिसांसोबत असलेल्या अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळीबार केला. यावेळी सुमारे 18 गोळ्या झाडण्यात आल्या. अतिक आणि अश्रफ यांच्या मृतदेहांचा प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे.

अतिकला 8 तर अशरफला 5 गोळ्या लागल्या.

16 एप्रिलला अतिक आणि अश्रफ यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. आज तकच्या बातमीनुसार, प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे आढळून आले आहे की गोळीबारादरम्यान अतिकच्या शरीरात 8 गोळ्या लागल्या. अहवालानुसार, अतिकच्या डोक्यावर, मानेवर, छातीवर, पोटावर आणि कंबरेला गोळ्या लागल्या होत्या. तर अश्रफला 5 गोळ्या लागल्या. अश्रफ यांच्या मानेवर, पाठीवर, मनगटावर, पोटावर आणि कमरेला गोळ्या लागल्या होत्या. तर तीन गोळ्या शरीराच्या आर – पार झाल्या होत्या.

आलिशान लक्झरी गाड्यांची अतिकला होती क्रेझ…

अतिकची दोन अल्पवयीन मुले स्मशानभूमीत पोहोचली

पोस्टमॉर्टमनंतर 16 एप्रिलला सायंकाळी अतिक आणि अश्रफ यांचे मृतदेह कासारी-मासारी स्मशानभूमीत आणण्यात आले. ज्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये अशरफचा मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आला, त्याच अ‍ॅम्ब्युलन्सने अतिकच्या दोन अल्पवयीन मुलांना बालगृहातून आणले. अश्रफ यांच्या दोन्ही मुलीही स्मशानात पोहोचल्या.

14 महिन्यांचा जेल भत्ता खाल्लाय, अनिल देशमुख यांचा वेगळाच अंदाज

अतिक अहमद आणि अशरफ यांच्या अंत्यसंस्कारासाठी जवळचे नातेवाईक पोहोचले. यादरम्यान प्रयागराजमधील कासारी-मासारी स्मशानभूमीबाहेर मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी मोजक्याच लोकांना प्रवेश दिला. यावेळी पोलिसांनी बुरख्यात आलेल्या महिलांवर विशेष नजर ठेवली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube