चांदीच्या विटा, दागिने व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित; आरोपानंतर श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे पहिल्यांदा प्रसिद्धीपत्रक

Ram Mandir-श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी (Swami Govindadev Giri) यांच्या नावाने हे पत्र काढण्यात आले.

  • Written By: Published:
Ram Mandir Donation Case

Ayodhya Ram Mandir donation case : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या (Ram Mandir) दानपेटीतील देणगी आणि रोख रकमेत अपहार केल्याप्रकरणी एसआयटीच्या अहवालानंतर आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आठ जणांना पोलिसांनी अटक केलीय. यात आता सोने, चांदीच्या अर्पण वस्तूबाबत वेगवेगळे दावे केले जात होते. आता त्यावर पहिल्यांचा श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र (न्यास) अयोध्या यांनी प्रसिद्धीपत्रक काढत बाजू मांडली आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी (Swami Govindadev Giri) यांच्या नावाने हे पत्र काढण्यात आले. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे आम्ही स्तब्ध, व्यथित आणि अत्यंत दुःखी आहोत. सर्व रामभक्त आणि रामसेवकांचे प्रतिनिधी म्हणून येथे सेवा करणारे आम्ही या प्रकरणाची निष्पक्ष आणि न्याय्य चौकशी करून रामभक्तांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे पत्रात म्हटले आहे.


चंपत राय, अनिल मिश्रांच्या राजीनाम्यावर विचार करणार

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र (ट्रस्टचे) महासचिव चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत. न्यासाच्या आगामी बैठकीत त्यावर विचार करण्यात येणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. या संबंधी 11 जुलाै रोजी बैठक होणार असल्याचे वृत्त आहे.

TET पेपर लीकप्रकरणी पोलिसांकडून धक्कादायक माहिती; दिल्ली हरियाणा कनेक्शन काय?


चांदीच्या विटा, दागिने व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित

ज्या भाविकांनी प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी चांदीच्या विटा, दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू न्यासाच्या अधिकाऱ्यांकडे वैयक्तिकरित्या सुपूर्द केल्या आहेत. त्या सर्व वस्तू सुरक्षित आहे. त्यांचा संपूर्ण हिशेब उपलब्ध आहे, असे ट्रस्टने स्पष्ट केलंय. मंदिरातील दानपेट्यांमधून प्राप्त झालेल्या रकमेबाबतच्या प्रकरणात, न्यासाच्या विनंतीवरून उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी (विशेष तपास पथक) ने सादर केलेल्या अंतरिम अहवालाच्या आधारे न्यासाने एफआयआर दाखल केला आहे. त्यानुसार कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे ट्रस्टने प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलंय.


2005 पूर्वीच्या महात्मा गांधी सिरीजच्या नोटा 30 जूनपर्यंत खरचं बदलून घ्याव्या लागणार?


दोषींवर कठोर शिक्षा व्हावी

पुढील काळात अशा प्रकारची कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल. असा विश्वास ट्रस्टने व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणातील दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, यासाठी ट्रस्ट आग्रही राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यासोबतच, समाजविघातक, अधार्मिक आणि स्वार्थी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी सनातन धर्माची बदनामी करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत, असेही ट्रस्टने म्हटले आहे. नागरिकांनी आणि रामभक्तांनी भ्रामक व निराधार अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच इतरांनाही अशा अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बादल छटेंगे, अंधेरा हटेगा, सत्य- सूर्य का प्रकाश होगा तथा श्रीरामभक्ति की प्रबल धारा अखंड बहती रहेगी। जय श्रीराम असे शेवटची पत्रात म्हटले आहे.

follow us