वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी! आजपासून नियमांमध्ये बदल, ‘या’ वाहनांना द्यावा लागणार दुप्पट टोल

  • Written By: Published:
वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी! आजपासून नियमांमध्ये बदल, ‘या’ वाहनांना द्यावा लागणार दुप्पट टोल

New Rules for FASTag Toll Plazas  Today : वाहनधारकांसाठी आजपासून (सोमवार) नियमांमध्ये मोठा बदल होत आहे. टोल टॅक्ससाठी फास्ट टॅगचा वापर वाहनधारकांसाठी आहे. यामध्ये जर एखाद्याचा फास्टॅग कोणत्याही कारणास्तव ब्लॅकलिस्टेड, बंद किंवा निष्क्रिय असेल तर टोल बूथ ओलांडण्यापूर्वी 60 मिनिटे आधी तो रिचार्ज (Plazas) करावा लागेल. टोल ओलांडल्यानंतर १० मिनिटांनीही हे काम करता येते. जर चालकाने तसं केले नाही तर त्याला दुप्पट टोल भरावा लागेल.

Toll Free : आता 20 किलोमीटर बिनधास्त गाडी चालवा, कारण..,

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने अलीकडेच नवीन नियम जारी केले आहेत, जे १७ फेब्रुवारीपासून लागू होत आहेत. टोल कर संकलन आणखी सुलभ करणे आणि टोल नाक्यांवरील वाहतूक सुधारणे हे यामागील उद्दिष्ट आहे. नियमांनुसार खात्यात अपुरी रक्कम, केवायसी अपूर्ण असेल किंवा वाहतूक विभागाशी कोणत्याही वादामुळे फास्टॅगला ब्लॅक लिस्टमध्ये टाकता येतो. दंड टाळण्यासाठी वाहनचालकांना टोल प्लाझा गाठण्यापूर्वी त्यांच्या FASTag खात्यात पुरेशी रक्कम ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

रिचार्ज करण्यासाठी ७० मिनिटांची वेळ मर्यादा

१. जर फास्टॅग स्कॅनिंग करण्यापूर्वी एक तास किंवा स्कॅनिंगनंतर १० मिनिटे निष्क्रिय राहिला तर पेमेंट अवैध होईल. म्हणजे, या परिस्थितीत, खात्यात पैसे कमी असल्यास किंवा नसतील तर वाहन टोल बूथवरून जाईल परंतु फास्टॅग सुरक्षा रकमेच्या दुप्पट रक्कम कापली जाईल. पुढच्या वेळी फास्टॅग रिचार्ज केल्यावर ही रक्कम कापली जाईल.

२. ड्रायव्हरला त्याचा ब्लॅकलिस्टेड किंवा ब्लॉक केलेला फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी ७० मिनिटांची वेळ मर्यादा असेल. म्हणजे, जर एखाद्या ड्रायव्हरला टोल बूथ ओलांडायचा असेल तर त्याला बंद केलेला फास्टॅग ६० मिनिटे आधी रिचार्ज करावा लागेल. तो बूथ ओलांडल्यानंतर १० मिनिटांनीही हे करू शकतो परंतु त्याच वेळी त्याला पुन्हा केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

३. जर नियमांकडे दुर्लक्ष केले गेले तर चालकाला दुप्पट रोख रक्कम भरावी लागेल. म्हणजे, दुचाकी वगळता सर्व प्रकारच्या वाहनांवर फास्टॅग बसवणे अनिवार्य आहे. जर फास्टॅग निष्क्रिय असेल किंवा बंद असेल तर वाहनचालक रोख रक्कम देऊन टोल बूथचा वापर करू शकतात. पण यासाठी तुमच्याकडून सामान्य टोल शुल्काच्या दुप्पट शुल्क आकारले जाईल.

फास्ट टॅग ब्लॅक लिस्टेड कधी होतो?

जेव्हा खात्यात कमी शिल्लक असेल

केवायसीची अंतिम मुदत संपल्यावर

वाहनाशी संबंधित कोणताही कायदेशीर वाद असल्यास

वाद मिटल्याशिवाय टोल बूथ ब्लॅकलिस्ट टॅग वापरता येणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या