छत्तीसगड मधल्या वादावर काँग्रेसचा नवा तोडगा, टीएस सिंह देव छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री

छत्तीसगड मधल्या वादावर काँग्रेसचा नवा तोडगा, टीएस सिंह देव छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री

TS Singh Deo: 2018 मध्ये छत्तीसगडमध्ये 15 वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली होती. मात्र यानंतर टीएस सिंह देव आणि भूपेश बघेल यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून युद्ध सुरू झाला होता. टीएस सिंह देव आणि भूपेश बघेल अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता. पण भूपेश बघेल यांनी मुख्यमंत्री सोडण्यास नकार दिला होता. मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि टी एस सिंग देव यांच्यात सातत्याने सत्तासंघर्ष सुरु होता. आता छत्तीसगड मधल्या अंतर्गत संघर्षावर काँग्रेसने नवा तोडगा काढत टी एस सिंह देव यांची उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती केली आहे.

छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री टीएस सिंह देव यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. नवीन जबाबदारी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. बुधवारी दिल्लीत छत्तीसगडबाबत काँग्रेस हायकमांडची बैठक झाली होती. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि टीएस सिंह देव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. या नियुक्तीमुळे छत्तीसगडमधील काँग्रेसने वाद मिटवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

गोळीबारानंतर भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले हल्लेखोर…

2018 च्या विधानसभा निवडणुकीत भूपेश बघेल आणि टीएस सिंह देव यांच्या जोडीने काँग्रेसला सत्तेत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट केले की, “आम्ही तयार आहोत. महाराज साहेबांना उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.”

छत्तीसगडमधील विजयानंतर मुख्यमंत्र्यांची खुर्ची कोणाच्या हाती द्यायची हा काँग्रेस हायकमांडसमोर सर्वात मोठा प्रश्न होता. शेवटी भूपेश बघेल यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची कमान आली होती. तेव्हापासून दोन्ही नेत्यांमधील संबंध बिघडल्याचे बोलले जात होते. मात्र, अनेक प्रसंगी दोन्ही नेते एकत्र दिसले होते. त्यानंतरही दोघांमध्ये वाद असल्याचे बोलेले जात होते.

मोठी बातमी : चांद्रयान – 3 प्रक्षेपणासाठी सज्ज, 12-ते 19 जुलै दरम्यान आकाशात झेपावणार

त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव म्हणजेच टीएस सिंह देव हे सुरगुजा राजघराण्यातील आहेत. ते या राजघराण्याचे 118वा राजा आहे. अंबिकापूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा (2008, 2013, 2018) आमदार आहेत. छत्तीसगड सरकारमध्ये ते क्रमांक दोनचे नेते आहेत. 2013 मध्ये त्यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बनवण्यात आले होते. त्यानंतर 2014 मध्ये त्यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube