मोठा दिलासा! गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घट; नवीन आर्थिक वर्षाचं गिफ्ट
नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाच्या (New Financial Year)(2023-24) पहिल्याच दिवशी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial Gas Cylinders)दरात कपात केली आहे. तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी (Gas Marketing Companies)एकप्रकारे नवीन आर्थिक वर्षाचं गिफ्ट दिलं आहे. त्याचवेळी सर्वसामान्यांना मात्र कोणताही दिलासा मिळालेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ किंवा घट झालेली नाही.
मागील महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या (Domestic gas cylinder)किंमतीत 50 रुपयांपर्यंत दरवाढ करण्यात आली होती. सुमारे 7 महिन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. या महिण्यात मात्र एलपीजी सिलिंडर (LPG cylinder)महागलाही आणि स्वस्तही झाला नाही. याचा अर्थ देशातील चारही महानगरांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत जैसे थेच असणार आहे.
शरद पवारांचे सहकारी शरद काळे यांचे निधन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
देशातील चारही महानगरांमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1 हजार 103 रुपये आहे. कोलकातामध्ये 1 हजार 129 रुपये, मुंबईत 1 हजार 102.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1 हजार 118.50 रुपये एवढी आहे.
तर दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात घट झाली आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 91.5 रुपयांनी कमी झाल्या आहेत. दुसरीकडे, कोलकात्यात ते 89.5 रुपयांनी आणि चेन्नईमध्ये 75.5 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत 2 हजार 28 रुपये, कोलकात्यात 2 हजार 132 रुपये, मुंबईत 1 हजार 980 रुपये आणि चेन्नईमध्ये 2 हजरा 192.50 रुपये झाली आहे.