राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांना मोठा दिलासा; खासदारी पुन्हा बहाल

राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांना मोठा दिलासा; खासदारी पुन्हा बहाल

नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्राबाहेरील (Maharashtra)एकमेव खासदार मोहम्मद फैजल (MP Mohammad Faizal)यांना लोकसभा सचिवालयाकडून (Lok Sabha Secretariat)मोठा दिलासा मिळाला आहे. लक्षद्वीपचे (Lakshadweep)खासदार मोहम्मद फैजल यांना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करत असल्याचे लोकसभा सचिवालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

लक्षद्वीपमधील राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी एका फौजदारी खटल्यामुळे रद्द केली होती. फैजल यांना त्या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे फैजल यांना अपात्र करण्यात आल्याची माहिती लोकसभा सचिवालयाकडून दोन महिण्यांपूर्वी देण्यात आली होती.

मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीवर, जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं 

2009 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कॉंग्रेस नेते पी.एम.सईद यांचे जावई आणि कॉंग्रेस नेते मोहम्मद सालेह यांच्यावर हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये मोहम्मद फैजल यांनी मदत केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी लक्षद्वीपमधील करवत्ती जिल्हा आणि सत्र न्यायालयाने खासदार मोहम्मद फैजल यांच्यासह तिघांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्याचबरोबर चौघांनाही एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. त्यानंतर आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप मोहम्मद फैजल यांनी केला होता.

त्यानंतर हत्येचा प्रयत्न केल्याबद्दलच्या गुन्ह्याला केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतरही मोहम्मद फैजल यांच्यावरील खासदारकीच्या अपात्रतेवरील कारवाईला टाळलं जात असल्याचा आरोप फैजल यांच्याकडून करण्यात आला होता. त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या लक्षद्वीप येथील पोटनिवडणूक घेण्याच्या अधिसूचनेलाही फैजल यांनी आव्हान दिलं होतं.

त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही अधिसूचना रद्द केली होती. मात्र त्यानंतरही फैजल यांची खासदारकी बहाल केली जात नव्हती, आता मात्र लोकसभा सचिवालयाकडून मोहम्मद फैजल यांना त्यांची खासदारकी बहाल करण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube