सम्राट चौधरी : बिहारच्या राजकारणात भाजपचा ‘सम्राट’ पॅटर्न; ज्यांनी घडवलं, त्यांनाच नडणार !

Samrat Choudhary-बिहारीबाबूंना सम्राट चौधरी यांच्या रुपाने नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. भाजपचा पहिल्यांदा बिहारमध्ये मुख्यमंत्री झालाय.

  • Written By: Published:
Samrat Chaudhari

Bihar New CM Samrat Choudhary : बिहार म्हटलंय की डोळ्यासमोर येते गुंडगिरी, बाहुबली नेते आणि गरिबी. लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्या भोवतीच बिहारचे राजकारण फिरत राहिले. जेडीयूचे नितीशबाबू हे तब्बल 20 वर्ष बिहारचे मुख्यमंत्री राहिले. कधी लालू यांच्या आरजेडीबरोबर, तर कधी भाजपबरोबर (bjp) जात राज्याचे प्रमुख राहिलेले आहे. आता बिहारमधील नितीशराज संपलंय. बिहारीबाबूंना सम्राट चौधरी (Samrat Choudhary) यांच्या रुपाने नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. भाजपचा पहिल्यांदा बिहारमध्ये मुख्यमंत्री झालाय. पण सम्राट चौधरी कोण आहेत ? लालू आणि नितीशकुमार यांच्या पक्षाशी त्यांचे काय संबंध आहेत, ते पाहुया…

नितीश कुमार हे राज्यसभेत जात आहे. त्यामुळे त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा मंगळवारी राजीनामा दिला. त्यापूर्वीच मुख्यमंत्रिपद भाजपला देण्याचा पक्क झालं होतं. कारण बिहार विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तर इतर स्थानिक छोट्या पक्षांचा पाठिंबा भाजपला आहे. केंद्रीयमंत्री शिवराज सिंह चौहान पक्ष निरीक्षक म्हणून पाटणाला गेले होते. त्यांच्याबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, बी. एल. संतोष आणि विनोद तावडे हेही उपस्थित होते. त्यात आता बिहारची सूत्रे सम्राट चौधरी यांच्या हातात देण्याचे निश्चित झाले आहे.

सम्राट चौधरी कोण आहेत?
सम्राट चौधरी यांनी बिहार विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. ते सध्या उपमुख्यमंत्री आहे. त्यांच्याकडे गृह विभागाची जबाबदारीही आहे. त्यांनी बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. ते मुंगेर जिल्ह्याचे रहिवासी आहे. कुशवाह समाजातून (ओबीसी) आलेले शकुनी चौधरी यांचे सुपुत्र आहेत. 57 वर्षीय सम्राट चौधरी यांचे वडील शकुनी चौधरी समता पक्षाच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांनी स्वतः खासदार आणि आमदार म्हणून काम पाहिले. शकुनी चौधरी एकेकाळी लालू प्रसाद यांच्या खूप जवळचे होते. सम्राट चौधरी यांचे राजकीय कारकीर्द लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षातून झाली. सम्राट चौधरी 1990 मध्ये सक्रिय राजकारणात दाखल झाले. 1995 मध्ये एका राजकीय प्रकरणात त्यांना तुरुंगवास झाली. त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी राबडी देवी यांच्या सरकारमध्ये कृषिमंत्री झाले. कमी वयात ते मंत्री झाल्याने वाद झाला. त्यानंतर त्यांचे मंत्रिपद काढून घेतले. 2005 मध्ये आरजेडी सत्तेतून बाहेर पडल्यानंतरही ते बराच काळ पक्षासोबत राहिले आहे. 2014 मध्ये आरजेडीला सोडचिठ्ठी देत सम्राट चौधरी हे नितीशकुमार यांच्या जेडीयू दाखल झाले. त्यानंतर जीतनराम मांझी यांच्या सरकारमध्ये शहरी विकास आणि आवास मंत्री झाले.

भाजपमध्ये दाखल झाले अन् पक्ष टॉपवर नेला
पण 2017 मध्ये ते भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष झाले. 2020 मध्ये विधानपरिषदेचे सदस्य झाले. त्यानंतर बिहार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते झाले. 2023 ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सम्राट चौधरी यांनी एक मोठा करिश्मा केला. विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. पण तरीही नितीशकुमार हे बिहारचे मुख्यमंत्री झाले हे भाजपच्या नेत्यांच्या मनात खटकत होते. शेवटी नितीशकुमार यांनी दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला आणि भाजपच्या मुख्यमंत्रिपदाची वाट मोकळी झाली. आता बिहारमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांचे राज्य आलाय.

follow us