6 जून हा काळा दिवस… इंदिरा गांधींच्या ऑपरेशन ब्लू स्टारबाबत मंत्री महाजनांचं वादग्रस्त वक्तव्य
Girish Mahajan Operation Blue Star बाबत गिरीश महाजन यांनी 6 जून हा काळा दिवस आहे. असं म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
BJP Minister Girish Mahajan Controversial Statement about Indira Gandhi’s Operation Blue Star : ऑपरेशन ब्लू स्टारच्या 42 व्या स्मृतीदिनाचं पंजाबमधील अमृतसर येथे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी 6 जून हा काळा दिवस आहे. असं म्हणत इंदिरा गांधींच्या ऑपरेशन ब्लू स्टारबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून आता विरोधकांकडून भाजप आणि महाजनांसह फडणवीसांना देखील टीकेचं धनी केलं जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
1984 मध्ये पंजाबमध्ये शीख दंगल उसळली होती. त्याला मोडून काढण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार राबवलं होतं. यामध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये थेट सैन्य घुसवण्यात आलं होतं. याच ऑपरेशन ब्लू स्टारच्या 42 व्या स्मृतीदिनाचं पंजाबमधील अमृतसर येथे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये भजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी 6 जून हा काळा दिवस आहे. असं म्हणत इंदिरा गांधींच्या ऑपरेशन ब्लू स्टारबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यासह देशातील राजकाऱणात खळबळ माजली आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
ज्याप्रमाणे अब्दालीने भारतावर आक्रमण केलं आणि आपले अनेक बांधव शहीद झाले. त्याच प्रमाणे आपल्याच देशात आपल्याच पंतप्रधानांनी आपले वाईट हाल केले होते. इतक्या हजारो हत्या झाल्यानंतर देखील कुणालाही शिक्षा झाली नाही. कुणालाही फाशी झाली नाही. ही दु:खाची बाब आहे. त्यांनी जाणून-बूजून आपल्या बांधवांची हत्या केली. हा इतिहातील काळा दिवस आहे. असं म्हणत गिरीश महाजनांनी 1984 च्या शीख दंगल आणि इंदिरा गांधींच्या ऑपरेशन ब्लू स्टारबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये शीख विभाजनवादी नेता जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा फोटो लावून उदात्तीकरण करण्यात आलं. महाजनांनी शीखांवर अन्याय झाल्याचं म्हणत त्यांना शहीद म्हटलं. तसेच आपण या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील आणणार असल्याचं महाजनांनी म्हटलं.