घटनेतून ‘इंडिया’ नाव वगळून भारत करा, देशाला गुलामीच्या प्रतिकातून मुक्त करण्याची भाजप खासदाराची मागणी

घटनेतून ‘इंडिया’ नाव वगळून भारत करा, देशाला गुलामीच्या प्रतिकातून मुक्त करण्याची भाजप खासदाराची मागणी

Remove India Name : संसदेच पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये विरोधकांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपला घेरले आहे. त्यामध्ये आता राज्यसभेमध्ये भाजप खासदार नरेश बन्सल यांनी एक मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, देशाचं इंडिया हे नाव इंग्रजांनी दिले आहे. ते गुलामीचं प्रतिक आहे. त्यामुळे घटनेतून देशाच इंडिया हे नाव वगळून भारत करण्यात यावं. अशी मागणी केली आहे. ( BJP MP Naresh Bansal demand for Remove India Name constitution in Rajya Sabha )

Akelli Teaser : नुसरत भरूचाच्या ‘अकेली’ चा अंगावर काट आणणाऱ्या टीझर रीलीज

काय म्हणाले नरेश बन्सल?

नरेश बन्सल म्हणाले की, गेल्या वर्षी 15 ऑगस्टला देशाला लाला किल्ल्यावरून संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, देशाला गुलाम बनवणाऱ्या सर्व गोष्टी आणि चिन्हांपासून देशाला मुक्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी वर्षभरात विविध पावलं उचलली त्यात त्यांनी ब्रिटीश कालातील चिन्ह हटवून पारंपारिक भारतीय चिन्हांची उभारणी केली.

शरद पवारही कोंडीत! मोदींसाठी पुण्यात थांबणार की केजरीवालांसाठी दिल्लीला जाणार?

मात्र इंग्रजांनी देशाचं नाव भारत बदलून त्यांनी इंडिया केलं. देशाचं इंडिया हे नाव इंग्रजांनी दिले आहे. ते गुलामीचं प्रतिक आहे. त्यामुळे घटनेतून देशाच इंडिया हे नाव वगळून भारत करण्यात यावं. अशी मागणी राज्यसभेमध्ये भाजप खासदार नरेश बन्सल यांनी केली आहे. भारत हे नाव देशाचं खरं नाव आहे. त्यात नावाने देशाला संबोधलं जाव असं ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube