भाजपचे ‘मिशन २०२४’ चार राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलले, ‘या’ नेत्यांच्या हातात कमान

  • Written By: Published:
भाजपचे ‘मिशन २०२४’ चार राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलले, ‘या’ नेत्यांच्या हातात कमान

या वर्षभरातील विधानसभा निवडणूका आणि आगामी वर्षातील लोकसभा निवडणूका लक्षात घेता भाजपने ४ राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. भाजपने दिल्ली, ओडिशा, राजस्थान आणि बिहारमध्ये नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. बिहारमध्ये सम्राट चौधरी यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. राजस्थानमध्ये चित्तौडगडचे खासदार सीपी जोशी यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले असून वीरेंद्र सचदेवा यांच्याकडे दिल्लीची कमान सोपवण्यात आली आहे. ओडिशातही नेतृत्व बदल करून माजी केंद्रीय मंत्री मनमोहन सामल यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे.

Sanjay Raut यांना संसदीय गटनेते पदावरून हटवले; शिंदे-ठाकरे वादाचा नवा अंक

बिहारमध्ये संजय जयस्वाल यांच्या जागी सम्राट चौधरी यांची नेमणूक करणे मोठे पाऊल मानले जात आहे.  भाजप गेल्या अनेक वर्षांपासून सम्राट चौधरी यांना प्रमोट करत होते. त्याचवेळी राजस्थानमध्ये भाजप अध्यक्ष सतीश पुनिया आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यातील गटबाजीमुळे पक्ष अडचणीत आला होता. अशा परिस्थितीत सतीश पुनिया यांच्या जागी सीपी जोशी यांच्याकडे कमान सोपवण्यात आली आहे. पुनिया हे जाट नेते असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. पक्षातील गटबाजी थांबवण्यासाठी गुलाबचंद कटारिया यांना आसामचे राज्यपाल बनवण्यात आले. आता सतीश पुनिया यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

कटारिया यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर वसुंधरा राजे गटाला बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता पुनिया यांनाही काढून टाकण्यात आले आहे. भाजपला निवडणुकीपूर्वी कोणत्याही प्रकारची दुफळी नको असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजस्थानमधील भाजपचे केंद्रीय नेतृत्व सातत्याने निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढणार असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवण्याची मागणी त्यांच्या समर्थकांची आहे. याबाबत पक्षात मतभेद आहेत.

Women Maharashtra Kesari : सांगलीत आजपासून रंगणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा; क्रीडा वर्तुळात उत्सुकता शिगेला

 

बिहारमध्ये भाजपला सम्राट चौधरी यांना अध्यक्ष करून ओबीसी वर्गात आपली पकड मजबूत करायची आहे. विशेषत: कुशवाह आणि कोरी समाजात नितीश कुमार यांचा प्रभाव मानला जातो, त्यावर भाजपने घाव घालण्याची तयारी केली आहे. जेडीयूपासून वेगळे झाल्यापासून भाजप ओबीसी, एमबीसी आणि दलितांना लक्ष्य करत आहे. ओडिशातही अनेक दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष समीर मोहंती यांना पदावरून हटवण्याची मागणी होत होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube